महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

SC Lists The Kerala Story Stay Plea : द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय 15 मेला करणार सुनावणी

द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 15 मे रोजी या प्रकरणावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

By

Published : May 9, 2023, 1:51 PM IST

SC Lists The Kerala Story Stay Plea
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली :सध्या देशभरात द केरळ स्टोरी या चित्रपटावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर 15 मे रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे. या खटल्याची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. यापूर्वी केरळ उच्च न्यायालयाने द केरळ स्टोरी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या स्थगितीस नकार दिला होता. धर्मनिरपेक्ष केरळमधील समाज हा चित्रपट आहे तसा स्वीकारेल, यावर उच्च न्यायालयाने भर दिला होता.

ट्रेलरमध्ये काय आक्षेपार्ह आहे : द केरळ स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर नोव्हेंबरमध्येच प्रदर्शित करण्यात आला होता. केवळ चित्रपट प्रदर्शित करून काही होणार नाही. चित्रपटाचा टीझर नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात आक्षेपार्ह काय होते? अल्लाह एकच देव आहे असे म्हणण्यात गैर काय आहे? असा सवालही न्यायालयाने केला. त्यासह ट्रेलरमध्ये काय आक्षेपार्ह आहे? असेही यावेळी न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

हा चित्रपट जातीयवाद कसा निर्माण करतो :द केरळ स्टोरी या चित्रपटावर निर्णय देताना न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलाच धक्का दिला होता. अशा संघटनांनी यापूर्वीही अनेक चित्रपटाला विरोध केला आहे. यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये हिंदू भिक्षूक आणि ख्रिश्चन धर्मगुरू यांच्या विरोधात संदर्भ आले आहेत. आता यात विशेष काय आहे? हा चित्रपट कसा जातीयवाद निर्माण करतो असा सवालही न्यायालयाने केला. हा चित्रपट निरपराध लोकांच्या मनात विष कालवेल, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. आतापर्यंत कोणत्याही एजन्सीला केरळमध्ये 'लव्ह जिहाद'चे प्रकरण आढळले नसल्याचा दावा या याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यावर न्यायमूर्ती एन नागेश आणि न्यायमूर्ती मोहम्मद नियास सीपी यांच्या खंडपीठाने यावर निर्णय देत याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

केरळमधील 32 हजार मुली गायब :द केरळ स्टोरी हा चित्रपट सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केला आहे. तर विपुल अमृतलाल शाह यांची निर्मिती आहे. या चित्रपटाने मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी आदी कलावंतांच्या भूमिका आहेत. सुदीप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या ट्रेलरवर राज्यातील 32 हजार मुली बेपत्ता झाल्याचा उल्लेख होता. त्या नंतर ISIS या दहशतवादी गटात सामील झाल्याचा दावा करत टीका करण्यात आली. मात्र विरोधामुळे निर्मात्यांना हा आकडा मागे घ्यावा लागला.

ABOUT THE AUTHOR

...view details