महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सपा नेते आझम खान यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन केला मंजूर - आझम खान बेल

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर केला. उत्तर प्रदेशातील रामपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनशी संबंधित एका प्रकरणात त्यांना हा दिलासा मिळाला आहे.

sp leader azam khan interim bail
आझम खान बेल सर्वोच्च न्यायालय निर्णय

By

Published : May 19, 2022, 2:18 PM IST

लखनऊ -समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर केला. उत्तर प्रदेशातील रामपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनशी संबंधित एका प्रकरणात त्यांना हा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, 89 व्या प्रकरणात आझम यांना हा जामीन देण्यात आला आहे. कोर्टाने याप्रकरणी आधीच सुनावणी पूर्ण करून जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

हेही वाचा -पाकिस्तानी नागरिकाने भारतातील राम जानकी मंदिराची केली विक्री, खरेदीदाराने मंदिराच्या जागेवर बांधले हॉटेल

सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना सांगितले की, आझम खानच्या जामिनाच्या अटी ट्रायल कोर्ट ठरवतील आणि सामान्य जामिनासाठी आझम खान यांना दोन आठवड्यांच्या आत योग्य आणि सक्षम कोर्टात अर्ज करावा लागेल.

सुप्रीम कोर्टाने घटनेच्या कलम 142 नुसार आपल्या अधिकाराचा वापर करत आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आझम खान यांना आतापर्यंत ८८ प्रकरणांमध्ये ट्रायल कोर्टातून जामीन मिळाला होता, मात्र ८९ व्या प्रकरणात जामिनासाठी खटला सुरू होणार होता. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून अंतरिम जामीन मंजूर केला.

यूपी सरकारने जामिनाला विरोध केला होता - मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान असिस्टंट सॉलिसिटर जनरल राजू यांनी सुप्रीम कोर्टात आझम खान यांच्या जामिनाला विरोध केला. ज्या एसडीएमने माझ्यावर केसेस लिहिली आहेत त्यांना मी बघेन. फक्त माझे सरकार येऊ द्या, असे आझम खान यांनी विधान केले होते, असे राजू यांनी म्हटले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, राजू तुम्ही असे करू शकत नाही. त्यावर राजू तुम्ही असे करू शकत नाही. जामीन हा वेगळा विषय आहे आणि त्यानंतर जेल हा वेगळा विषय आहे, अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाने दिली होती.

हेही वाचा -Truck Crushed 14 Laborer : भीषण अपघात, रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १४ मजुरांना ट्रकने चिरडले, तिघांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details