महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सर्वोच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना दिलासा नाही, 3 ऑगस्टला होणार सुनावणी - money laundering case news

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायाधीस ए. एम. खानविलकर यांनी सुनावणी घेतली. अनिल देशमुख यांच्या प्रकरणातील याचिकेवर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

अनिल देशमुख
अनिल देशमुख

By

Published : Jul 30, 2021, 6:47 PM IST

Updated : Jul 30, 2021, 6:53 PM IST

नवी दिल्ली - मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळण्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायाधीस ए. एम. खानविलकर यांनी सुनावणी घेतली. अनिल देशमुख यांच्या प्रकरणातील याचिकेवर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. अटकेपासून संरक्षण मिळणार (coercive action) नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने म्हटले आहे.

हेही वाचा-भगतसिंगची भूमिका करताना गळ्याला लागली फाशी...10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

दंडात्मक कारवाई करण्यावर स्थगिती द्यावी -

ईडीने अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला आहे. या संबंधी त्यांना ईडीने तीन समन्स बजावले आहेत. त्यानंतर देशमुख पिता - पुत्राने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. देशमुख पिता-पुत्राविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यावर स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

हेही वाचा-सीमावादावर चर्चा करण्यासाठी भारत-चीन सैन्यात उद्या चर्चेची बारावी फेरी

ईडीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला नकार देत बजावले होते तिसरे समन्स -

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावून ५ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. ईडीकडून तीन समन्स बजावण्यात आले आहेत. पहिल्या दोन समन्सला ते ईडीसमोर हजर झाले नाही. देशमुखांनी ईडीला पत्र लिहून सांगितले होते, की त्यांचे वय ७२ वर्षे असून ते अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत. कोरोनामुळे त्यांना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांनी ईडीच्या चौकशीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची विनंती केली होती. मात्र ईडीने त्यांची मागणी नाकारत त्यांना तिसरा समन्स बजावून ५ जुलै रोजी चौकशीला बोलावले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातच देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश याला ६ जुलै रोजी चौकशीला बोलावले होते.

देशमुखांच्या खाजगी सचिव आणि सहायकाला ईडीने केले आहे अटक -

ईडीने काही दिवसांपूर्वीच देशमुख यांच्या नागपूर आणि मुबंई येथील अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. त्यांच्या काही सहकाऱ्यांची चौकशी ईडी करत आहे. देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे.

Last Updated : Jul 30, 2021, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details