नवी दिल्ली :भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सात उच्च न्यायालयांसाठी मुख्य न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांची गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली. न्यायमूर्ती सोनिया जी गोकाणी यांच्या निवृत्तीनंतर गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जागा रिक्त झाली होती.
मुख्य न्यायाधीशांमध्ये एकही महिला नाही : न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल या उच्च न्यायालयाच्या एकमेव महिला मुख्य न्यायाधीश असतील. सध्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांमध्ये एकही महिला नाही. न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांच्या नावाचा विचार करताना कॉलेजियमने ही वस्तुस्थिती विचारात घेतली आहे.
सल्लागार न्यायाधीशांनी दर्शवली सहमती :मेमोरँडम ऑफ प्रोसिजरच्या बाबत गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांची योग्यता तपासण्यात आली. त्यांच्या योग्यता तपासण्यासाठी सल्लागार न्यायाधीशांशी सल्लामसलत करण्यात आली आहे. सल्लागार न्यायाधीशांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला सहमती दर्शविल्याची माहिती कॉलेजियमने दिली आहे.
तेलंगणा उच्च न्यायालयात हे होणार मुख्य न्यायाधीश :कॉलेजियमने कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली. न्यायमूर्ती आलोक आराधे यांची 29 डिसेंबर 2009 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते त्यांच्या मूळ उच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. ते नोव्हेंबर 2018 पासून कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बदली होऊन कार्यरत आहेत. दोन मोठ्या उच्च न्यायालयांमध्ये न्याय देण्याचा 13 वर्षांहून अधिक अनुभव त्यांनी संपादन केला आहे. न्यायमूर्ती आलोक आराधे तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी सर्व बाबतीत योग्य असल्याचे कॉलेजियमचे असे मत आहे.
मुंबई उच्च न्यायालयात 'या' न्यायमूर्तीची शिफारस :कॉलेजियमने अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती उपाध्याय यांची 21 नोव्हेंबर 2011 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते उच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. ते त्यांच्या पदोन्नतीपासून तेथे कार्यरत आहेत. त्यांना देशातील सर्वात मोठ्या उच्च न्यायालयात न्याय देण्याचा 11 वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे.
या न्यायालयात आहेत 160 न्यायाधीश :अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे एकूण 160 न्यायाधीश संख्या असलेले सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी सर्व बाबतीत योग्य असल्याचे कॉलेजियमचे असे मत आहे. कॉलेजियमने प्रकाशित केलेल्या ठरावात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा -
- Maharashtra Political Crisis: न्यायमूर्ती शाह यांच्या निवृत्तीपूर्वीच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल - उज्वल निकम
- Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या संकुलासाठी जमीन मिळेना, न्यायालयाकडून खेद व्यक्त