हैदराबाद : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी येते. याला पवित्र एकादशी असेही म्हटले जाते. हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व असल्याने या एकादशीचे दुहेरी महत्त्व आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. यंदा अधिकमासामुळे 26 एकादशी आहेत. आज पुत्रदा एकादशीचे व्रत आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत फार फलदायी असल्याचे सांगितले आहे.
पुत्रदा एकादशीचे महत्त्व :अध्यात्मिक गुरू आणि ज्योतिषी शिवकुमार शर्मा म्हणाले, पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप, धन संकट तसेच यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. पुत्रदा एकादशीचे व्रतदेखील अपत्यप्राप्तीसाठी पाळले जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत खऱ्या मनाने पाळल्याने निपुत्रिक जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, अशी आख्यायिका आहे.
उपासनेची पद्धत :पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील मंदिरात दिवा लावा. भगवान विष्णूला गंगाजलाने अभिषेक करा. एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प करा. भगवान विष्णूची आराधना करा आणि विष्णु सहस्रनामाचा जप करा. दूध, दही, नैवेद्य वगैरे अर्पण करा. विष्णु सहस्रनाम, गोपाल सहस्रनाम, ओम नमः भगवते वासुदेवाय इत्यादी जप करा, असे केल्याने परम कल्याण होते.