रायपूर - राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्यवीर सावरकरांवर पुन्हा एकदा टीका केली. त्यानंतर देशभरातून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजप व संघाने गांधीच्या या बयानावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे तर अनेक कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधीचे समर्थन केले आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील आता या वादात उडी घेतली आहे. बघेल यांनी सावरकरांचे जीवन दोन भागात पाहायला हवे असे म्हटले आहे.
Bhupesh Baghel: तुरुंगातून सुटल्या नंतर सावरकरांची कृती क्रांतिकारी प्रतिमेच्या विरुद्ध होती - भूपेश बघेल
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी देखील आता सावरकरांच्या वादात उडी घेतली आहे. (bhupesh baghel on savarkar). बघेल यांनी सावरकरांचे जीवन दोन भागात पाहायला हवे असे म्हटले आहे.
काय म्हणाले भूपेश बघेल -भूपेश बघेल म्हणाले, "स्वातंत्र्यलढ्यात अनेक लोक तुरुंगात गेले. बाळ गंगाधर टिळकांनी कधीही माफी मागितली नाही. सरदार भगतसिंग, गांधीजी, नेहरूजी किंवा सरदार पटेल यांनीही कधीच माफी मगितली नाही. सावरकरांना जीवन दोन भागात पाहायला हवे. एक म्हणजे ते तुरुंगात जाण्यापूर्वी, ज्यावेळी ते क्रांतिकारक होते. दुसरे म्हणजे तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी माफी मागितली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी अशी कृती केली जी त्यांच्या क्रांतिकारी प्रतिमेच्या अगदी विरुद्ध होती. त्यांनी इंग्रजांची बाजू घेऊन काम केले याचा इतिहास आहे."