हैदराबाद - बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला ( Salman Khan ) धमकीचं पत्र ( Death Threat Letter ) मिळाल्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या टीमने ( Mumbai Crime Branch ) वेगाने चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात ही टीम पुण्यात चौकशीसाठी जाऊन आली. या प्रकरणाचे धागेदोरे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि सौरभ महाकाल या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. धमकी पत्र प्रकरणी सौरभ महाकाल या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटकही केली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्ली गाठली होती.
सौरभ महाकालला पुण्यात अटक - बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घराबाहेर ( Salman Khan Death Threat Letter ) धमकीचं पत्र मिळाल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम ( Mumbai Crime Branch Enter In Pune ) पुण्यात गेली होती. या तपासात सौरभ महाकाल व्यक्तीचं नाव पुढे आल्यावर त्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोक्का अंतर्गत त्याच्यावर अटकेची ही कारवाई झाली आहे. पोलिसांच्या चौकशीत या पत्राचे संपूर्ण सत्य समोर आले आहे.
महाकालचा मोसेवाला हत्येशी संबंंध - या आरोपीच्या तारा पंजाबी गायक सिद्धू मोसेवाला ( Siddhu Moosewala Murder Case ) यांच्या हत्येशी संबंधित आहेत. आता त्याची चौकशी सुरू आहे. सिद्धू मोसेवालाच्या हत्येत त्याचा काही हात होता की नाही हे सध्या तरी कळू शकलेले नाही. पण आता अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो. दुसरीकडे, सलीम खान आणि अभिनेता सलमान खान यांना धमकीची पत्रे मिळाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा बुधवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी दिल्लीत जाऊन आली. मुंबई पोलिसांनी सलीम खान आणि सलमान खानचे जबाब नोंदवले असून सलमान खानच्या वांद्रे येथील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी सलमानच्या दोन अंगरक्षकांचे जबाबही नोंदवले आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खानला धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती.