पौष महिन्याला (Paush Purnima 2023) हिंदू धर्मात खूप महत्व आहे. हा महिना सुर्याचा महिना म्हणुन देखील ओळखला जातो. पौष पौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान केल्याने भरमसाठ पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यंदा पौष पौर्णिमा 6 जानेवारी 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भाविक चंद्र आणि सुर्याची पूजा करतात. या दोन देवतांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना (every wish fulfilled by worshipping) पूर्ण होतात, अशी श्रध्दा आहे.
पौष पौर्णिमा मुहूर्त (Paush Purnima 2023 Date) :6 जानेवारीला येणारी पौष पौर्णिमा ही 2023 सालची पहिली पौर्णिमा आहे. या दिवशी पूजा करण्याचे रिती-रिवाज हे शहर व प्रांतानुसार बदलतात. या दिवशी शास्त्रोक्त पध्दतीने पूजा केल्यास मुनष्याला मोक्ष प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यावेळी पौष पौर्णिमा ही 6 जानेवारीला दुपारी 2 वाजुन 16 मिनिटांनी सुरु होणार आहे. आणि 7 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजुन 37 मिनिटांनी संपणार आहे.
सर्वार्थ सिध्दी योग :उगवत्या तिथीनुसार पौष पौर्णिमा 6 जानेवारीला साजरी केली जाईल. यावेळी पौष पौर्णिमेलाही सर्वार्थ सिध्दी योग तयार (sarvartha siddhi yoga) होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या काळात केलेली सर्व कामे यशस्वी होतात. यावेळी हा योग 7 जानेवारी रोजी रात्री 12 वाजुन 14 मिनिटांनी सुरु होईल आणि सकाळी 7 वाजुन 15 मिनिटांनी संपणार आहे.