कुल्लू - आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखले जाते. याला महालय अमावस्या असेही म्हणतात. यावर्षी 25 सप्टेंबर 2022 रोजी सर्व पितृ अमावस्या हा सण साजरा होत आहे. या दिवशी श्राद्ध कर्म करून पितरांना निरोप दिला ( Shraddha for peace of ancestors ) जातो. या दिवशी सर्व ज्ञात अज्ञात पूर्वजांचे श्राद्ध करतात. ( who cannot perform Shraddha on day perform Shraddha on Sarva Pitru Amavasya )
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हे पितर करतात श्राद्ध -असे म्हणतात की ज्या लोकांना पितरांची मृत्यु तारीख माहित नाही, ते या दिवशी श्राद्ध करू शकतात. या दिवशी श्राद्ध केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो. यासोबतच पूर्वज सुख, समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद देतात. सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही काम अवश्य करावे. त्याचबरोबर काही गोष्टी करणे निषिद्ध आहे.
प्राणी आणि पक्ष्यांना खाऊ घालणे - सर्व पितृ अमावस्या दिवशी श्राद्धहे योग्य विद्वान ब्राह्मणाकडूनच करावे. श्राद्ध कर्मामध्ये ब्राह्मणांना पूर्ण भक्तीभावाने दान दिले जाते. परंतु जर तुम्ही कोणत्याही गरीब, गरजू व्यक्तीला मदत केली तरी तुम्हाला त्याचे खूप पुण्य प्राप्त होते. यासोबतच गाय,श्वान, कावळा इत्यादी पशू आणि पक्ष्यांसाठी अन्नाचा काही भाग ठेवला ( Feed animals and birds on Sarva Pitru Amavasya )जातो.