चंदीगड ( हरियाणा ) :हरियाणाच्या सरपंच निवडणुकीवेळी ( Sarpanch Election In Haryana ) दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे फतेहाबादच्या नाधोडी गावातील ग्रामस्थांनी ( Haryana Panchayat Election ) बंधुभावाचा अप्रतिम नमुना दाखवून दिला आहे. नाधोडी गावात अवघ्या एका मताने पराभूत झालेले उमेदवार ( Defeated By One Vote In Sarpanch Election ) सुंदर यांचा सत्कार करून ग्रामस्थांनी त्यांना ११ लाख ११ हजार रुपये रोख, स्विफ्ट डिझायर कार आणि दीड कॅनल जमीन भेट देऊन प्रोत्साहन दिले आहे.
sarpanch election : सरपंच पदाच्या निवडणुकीत उमेदवार पराभूत, गावाने वर्गणी गोळा करून दिली कार ११ लाख रुपये - Defeated By One Vote In Sarpanch Election
हरियाणाच्या नाधोडी गावातील पंचायत निवडणुकी नुकतीच पार पडली. ज्यात गावकऱ्यांचे बंधुभावाचा अप्रतिम उदाहरण पहायला मिळाले. नाधोडी गावातील ग्रामस्थांनी पराभूत झालेले उमेदवार सुंदर याला लाखोंचे बक्षीस दिले ( Villagers reward defeat candidate lakh rupees ) आहे.
वर्गणीतून पैसे जमा : गावकऱ्यांनी रोख रक्कम आणि स्विफ्ट कार वर्गणीतून जमा केलेल्या पैशांतून दिली आहे. तर दीड कनाल जमीन गावातीलच सुभाष भांभू नावाच्या व्यक्तीने दिली आहे. गावच्या या प्रयत्नाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतूक होत आहे. सुंदर यांनीही ग्रामस्थांचे आभार मानत ग्रामस्थांचे हे प्रेम हाच आपला सर्वात मोठा विजय असल्याचे सांगितले. गावकऱ्यांसोबत मिळून गावाच्या विकासात सर्वतोपरी योगदान देऊ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
गावातील दोन उमेदवार : फतेहाबादच्या नाधोडी गावात एकूण ५०८५ मते आहेत. त्यापैकी ४४१६ मतदार झाले. सुंदर आणि नरेंद्र हे गावातील दोन उमेदवार होते. आश्चर्यकारक निकालात सुंदर यांना 2200 मते मिळाली. तर नरेंद्र यांना 2201 मते मिळाली आणि नरेंद्र यांनी अवघ्या एका मताने निवडणूक जिंकली. यानंतर ग्रामस्थांनी बंधुभावाचा हा अनोखा नमुना सादर केला.