चेन्नई Dr S S Badrinath Passes Away :प्रसिद्ध विट्रेओरेटिनल सर्जन आणि शंकर नेत्रालयाचे संस्थापक (Sankara Nethralaya Founder) डॉ. एस एस बद्रीनाथ (Dr SS Badrinath) यांचं मंगळवारी वृद्धापकाळानं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत बद्रीनाथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.
कोण आहेत डॉ. सेंगमेडू श्रीनिवास बद्रीनाथ? : शंकर नेत्रालयाचे संस्थापक डॉ. सेंगमेडू श्रीनिवास बद्रीनाथ यांचं मंगळवारी निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. डॉ. बद्रीनाथ हे भारतीय लष्कराचे एक अशासकीय सदस्य होते. त्यांनी सैन्यात नेत्रचिकित्सक म्हणूनही काम केलं होतं. डॉक्टर बद्रीनाथ यांना 1983 मध्ये पद्मश्री आणि 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. अन्नामलाई आणि तामिळनाडू डॉ. एमजीआर वैद्यकीय विद्यापीठानं त्यांना 1995 मध्ये मानद डॉक्टरेट दिली होती.