नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आप आणि भाजपमध्ये साटलोट झाल्याची शंका खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. गुजरातचा निकाल अपेक्षित आहे. सर्वांनी एकत्र लढल्यास गुजरातमध्येही परिवर्तन शक्य आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची चांगली कामगिरी केली आहे. शिवसेनेने कधी भडकाविले नाही. छत्रपती शिवरायांचा अपमान होत आहे. त्याविरोधात आवाज उठविल्यास भडकावणे आहे का? भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. सीमावादावर कठोर भूमिका घ्या म्हणजे भडकाविणे आहे का? असा सवाल शिवसेनेचे नेते ( ठाकरे गट) संजय राऊत यांनी केला. ते ( Sanjay Raut slammed Chhatrapati Shivaji remark ) माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, संजय राऊत यांनी भडकाविणे थांबवावे, असे वक्तव्य राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.
27 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार:गुजरातसह हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ चा निकालाचा दिवस आहे. यावेळी गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाने लढत रंजक केली. मतमोजणीत भाजप आघाडीवर आहे. गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. यासह महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न देखील दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. यावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. तर, कर्नाटक मधील संघटनांकडून खासदार संजय राऊत यांना सातत्याने धमक्या येत आहेत. या सर्व विषयांवर खासदार संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला.
दिल्ली तुम्ही घ्या गुजरात आम्हाला सोडा:यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "महत्व पूर्व निवडणुका झाल्या आहेत. दिल्ली पालिकेतली १५ वर्षाची सत्ता भाजप कडून खेचून घेणे दिल्लीतून हे सोपे नाही. गुजरातचा निकाल अपेक्षित आहे. तिकडे जरी आप आणि अन्य पक्ष एकत्र आले असते तर निकाल वेगळा असता. त्याला आपण काटे की टक्कर असे म्हटले असते. पण, बहुतेक दिल्ली तुम्ही घ्या गुजरात आम्हाला सोडा असं काहीतरी झालं असावं, अशी लोकांना शंका आहे.
सर्वांनी एकत्र यावं, तरच विजय शक्य:हिमाचलमध्ये काँग्रेसने चांगलीच लढत दिली आहे. आणि ते चित्र अशादाही आहे. दिल्ली हातून गेला हिमाचलमध्ये संघर्ष करावा लागतो पण काँग्रेस जिंकेल. गुजरात दिल्ली बाबत त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. निवडणुकीचे आशादायी चित्र आहे. विरोधकांना एकत्र यावे लागेल. आपापसातले मतभेद दूर ठेवावे लागतील तर 2024 मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आशादायी पद्धतीचे निकाल आहेत. गुजरात मध्ये देखील लोकसभेत परिवर्तन होईल. जर सर्व एकत्र येऊन लढले तर हे शक्य आहे.