महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'ती' कागदपत्रे म्हणजे भिजलेला लवंगी फटाका; त्याला वातही नव्हती - संजय राऊत - संजय राऊत पत्रकार परिषद

परमबीर सिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस त्यांच्या माहेरी येऊन गेले. विरोधी पक्ष नेत्याच्या हातातील अहवालात काहीही दम नाही, त्या अहवालामध्ये सरकारला अडचणीत आणले अशी एकीही ओळ नाही. त्याची काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्री ठरवतील. सरकारमध्ये काही अधिकारी जुन्या सरकारवर निष्ठा ठेवणारे अधिकारी असू शकतात, त्यांनी निष्ठेने काही कागद बनवले असतील.

त्याला वातही नव्हती - संजय राऊत
त्याला वातही नव्हती - संजय राऊत

By

Published : Mar 24, 2021, 11:19 AM IST

Updated : Mar 24, 2021, 11:46 AM IST

नवी दिल्ली- अँटिलिया स्फोटके प्रकरणात बदली झाल्यानंतर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. त्याचे भांडवल करत विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाला आहे. या सर्व प्रकरणातील पुरावे केंद्रीय गृहसचिवांना सादर केले. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ती कागदपत्रे म्हणजे भिजलेला लंवगी फटका आहे, त्याला वातही नव्हती, असा टोला फडणवीस यांना लगावला आहे.

मात्र तो भिजलेला लवंगी फटाका-

राऊत पुढे म्हणाले की, परमबीर सिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस त्यांच्या माहेरी येऊन गेले. विरोधी पक्ष नेत्याच्या हातातील अहवालात काहीही दम नाही, त्या अहवालामध्ये सरकारला अडचणीत आणले अशी एकीही ओळ नाही. त्याची काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्री ठरवतील. सरकारमध्ये काही अधिकारी जुन्या सरकारवर निष्ठा ठेवणारे अधिकारी असू शकतात, त्यांनी निष्ठेने काही कागद बनवले असतील. मात्र तो भिजलेला लवंगी फटाका आहे, त्याला वातही नाही. असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

या प्रकरणाकडे आम्ही गांभीर्याने पहात नाही

या कागदपत्रामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नाही, आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच्याकडे असलेला महाराष्ट्रातील गृहविभागाकडे द्यायला हवा होता. त्याने महाराष्ट्राची इभ्रत राखली गेली असती. मात्र, त्यांच्या माहिती काही दम नाही, म्हणून ते दिल्लीत तो फटाका घेऊन आले आहेत. मात्र ते फटाके फुटत नाही. आम्ही या प्रकरणाकडे आम्ही गांभीर्याने पहात नाही, आम्ही आता त्यांचा पुढचा चित्रपट कोणता बनवतात आणि कोणता पडतोय हे पाहत असल्याची टीकाही राऊत यांनी केली.

परमबीर सिंग यांच्याच मागणीवर महाराष्ट्रात सीबीआयवर बंदी घातली. तेच आता सीबीआयकडे जात आहेत आणि फडणवीस दिल्लीत येत आहेत. मात्र, असे अनेक राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोप केले आहेत. वैभव कृष्ण यांनी जो योगींच्या विरोधात लेटरबॉम्ब लिहला होता. त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा रेट कार्ड दिले होते. त्यानंतर केंद्राच्या गृहसचिवांना हस्तक्षेप केला होता का? हे फडणवीसांनी समजून घ्यायला हवे, असा टोला राऊत यांनी दिला.

राज्याचे सरकार या सगळ्या गोष्टीचा तपास करण्यासाठी सक्षम आहे. हा काय फार मोठा अणुबॉम्ब नाही. राज्यात काही अधिकारी संघ विचाराचे आहेत, ते अधिकारी कोण आहेत हे आम्हाला चांगले माहिती आहे. मुख्यमत्री दोशींवर कारवाई कऱण्यासाठी सक्षम आहेत असेही राऊत म्हणाले.

आम्ही सगळे तानाजी मालुसरे बाजी प्रभु आहोत. आम्ही त्यांची बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. मुख्यमंत्री ही समोर येतील. तसेच राजभवन राजकीय अड्डा झालाय. राज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. कारण भाजपच्या दबावामुळेच १२ विधान परिषद आमदारांची नियुक्ती थांबविली आहे. विरोधकांनी राज्यपालांना भेटण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटावे.

Last Updated : Mar 24, 2021, 11:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details