नवीन वर्षाचा जल्लोष संपल्यावर गोव्यात उतरलो, पण गोवा त्याच आनंदाच्या, उत्साहाच्या लाटेवर उसळताना दिसले. संपूर्ण देश जणू गोव्यात अवतरला होता. (Rokhathok Article On Goa Election) सर्व बंधने झुगारून, कोरोना, ओमायक्रोन व्हायरसचा विचार न करता गोव्यात आनंदाची लाट उसळली. नव वर्षाचा जल्लोष संपला तरी त्या लाटेचे हेलकावे जाणवत होते. (Rokhathok Article On Election 2022) गोव्यात आता निवडणुकीचे वातावरण तापले आहे. (Goa Assembly Election 2022) विमानतळावरील खास कक्षात नितीन गडकरींची भेट झाली. (Rokhathok Article in Samana) मला वाटले, मोदी मंत्रिमंडळातील हा कार्यक्षम मंत्री शासकीय कामांसाठी गोव्यात उतरला, पण तेसुद्धा राजकीय कारणांसाठीच आलेले दिसले.
गोव्यात तृणमूल काँग्रेस येण्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल
गडकरी म्हणाले, 'गोव्यात निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलोय.' गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्यांची, केंद्रीय मंत्र्यांची रांग लागली आहे. (Congress in Goa Assembly Election) मनोहर पर्रीकरांशिवाय भाजप निवडणुकांना सामोरे जात आहे; पण कोणत्या मुद्यांवर भाजप निवडणुका लढणार? गेल्या दहा वर्षांपासून गोव्यात भाजपची सत्ता आहे. (Trunmul Congress in Goa Assembly Election) भाजपला येथे बहुमत कधीच मिळाले नाही. (Aap in Goa Assembly Election) निवडणुका संपल्यावर इतर पक्षांतील आमदारांना सरळ विकत घ्यायचे व बहुमत करायचे हे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे असा थेट आरोप रोखठोकमध्ये करण्यात आले आहेत. (BJP in Goa Assembly Election) या वेळीही भाजपास बहुमत मिळणार नाही, असे छातीठोकपणे सांगणारे लोक जागोजाग भेटले. गोव्यात तृणमूल काँग्रेस येण्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल. त्यामुळेच गोव्यात तृणमूलची हवा करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळण सुरू आहे. या पैशांचे धनी तृणमूल नसून दुसरेच कोणी तरी असावेत, असेही सांगणारे अनेक जण येथे भेटले असा खुलासाही यामध्ये केला आहे.
कसली ही सकाळ?
'दोन फुलांचा काळ, गोव्यात नवी सकाळ' अशा आशयाच्या शेकडो होर्डिंग्जनी गोव्यात जागोजाग लक्ष वेधून घेतले. काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार व प्रमुख नेते कोलकाता निवासी तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. गोवा काँग्रेसचे वर्किंग प्रेसिडेंट अलेक्सो रेजिनाल्डो यांनीही काँग्रेसचा त्याग करून अचानक तृणमूलचे फूल शर्टच्या खिशाला खोवले तेव्हा अनेकांना धक्का बसला. रेजिनाल्डो हे गोव्यातील एक स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रिय नेते. अत्यंत प्रामाणिक. लोकांच्या प्रश्नांवर लढणारा नेता अशी त्यांची ख्याती. गोव्याचे गढूळ वातावरण, भ्रष्ट राजकारण सुधारण्याची कुवत त्यांच्यात होती. ते काँग्रेस पक्षात राहिले असते तर बिघडले नसते, पण जे स्वतःच्या प्रतिमेवर निवडून येतील असे सर्व लोक तृणमूल काँग्रेसने जाळ्यात ओढले. चर्चिल आलेमाव यांचा मूळ पक्ष कोणता? हे त्यांनाही आठवत नसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते होते. आता तेही तृणमूलमध्ये गेले. अशा काही अस्थिर लोकांना घेऊन ममता बॅनर्जी यांना गोव्यातील नव्या सकाळचे स्वप्न पडले आहे. हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारे नाही.
भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात
गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाची असू शकते, पण भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात. याचा फायदा शेवटी कोणाला होणार? गोव्यातील भाजपचे आमदार व संभाव्य उमेदवार हे एकजात हिस्ट्री-शिटर्स आहेत. अफू-चरसचा व्यापार करणारे लोक उघडपणे भाजपात प्रवेश करतात व मुख्यमंत्री सावंत त्यांचे स्वागत करतात असे चित्र रोज दिसते. प्रत्येक जण सौदेबाजी करीत आहे. गोव्यात एका बाजूला मंदिरे तर दुसऱ्या बाजूला भव्य चर्च आहेत. दोन्ही प्रार्थनास्थळांत घंटानादाचे महत्त्व आहे. या घंटा आता धोक्याच्या ठरू नयेत इतके गोव्याचे राजकीय वातावरण बिघडले आहे.
काँग्रेस कोठे?
काँग्रेस पक्षाकडे मागच्या निवडणुकीनंतर 17 आमदार होते. ते आता 2 राहिले. बाकी सगळे पळून गेले. कारण गोव्यात काँग्रेसचे सक्षम नेतृत्व नाही. राष्ट्रीय भूमिका घेऊन गोव्यात निवडणुका लढवल्या जात नाहीत. दिल्लीच्या राजकारणाशी गोव्याचे नाते कधीच नव्हते. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून गेले, पण मनाने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घुटमळत राहिले. त्यामुळे तृणमूल, आपसारखे पक्ष बाहेरून येऊन गोव्याला धडे देत आहेत. 'आप'चे लोक आता गोव्यात स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा प्रचार करीत आहेत. गोव्याच्या निवडणुकीत आता भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यावर धुमशान सुरू आहे. पण गोव्यात आज एकही राजकीय पक्ष मूळच्या भूमिपुत्रांचा राहिलेला नाही. मुख्यमंत्री सावंतांनी आता सांगितले, पुढील पाच वर्षांत गोव्यात 30,000 नोकऱ्या उपलब्ध करून देऊ. ही सरळ थापेबाजी आहे. गेली 10 वर्षे भाजपचे राज्य आहे व बेरोजगारी प्रचंड वाढली. पैसे खाऊन सरकारी नोकऱ्या विकणारे त्यांच्याच सरकारात बसले आहेत असा थेट आरोप गोवा भाजपर यामध्ये करण्यात आला आहे.