नवी दिल्ली - पेगासस हेरगिरीवरून लोकसभेची दोन सभागृहांचे काम विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की संसदेचे काम चालविण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षांहून सत्ताधारी पक्षाची अधिक आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत संसदेत चर्चा करण्याकरिता सत्ताधारी पक्षाने प्रोत्साहन द्यायला हवे, असे खासदार राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, की आम्ही कोणतीही रणनीती करत नाही. आम्ही विरोधी पक्षांचे नेते एकत्रित निर्णय घेऊ. पेगासस हेरगिरीचे प्रकरण होत असताना राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे. त्यावर चर्चा करण्याकरिता सत्ताधारी सरकारने प्रोत्साहन द्यायला हवे. सरकारने असेच केले तर संपूर्ण पावसाळी अधिवेशनात अशीच स्थिती राहणार आहे.
सरकारच चर्चेपासून पळ काढत आहे-
सरकारने पुढे येऊन जबाबदारी घ्यायला हवी. पीगासस हेरगिरी हा लोकशाहीवर पाठीमागून आघात आहे. सरकारच चर्चेपासून पळ काढत आहे. संसदेमध्ये आम्हीही सत्ताधारी पक्षाबरोबर काम केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत चर्चा सरकारला करायची नसेल, तर सरकारला कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे. विरोधी पक्षांची राष्ट्रीय सुरक्षा आणि शेतकरी कायद्याबाबबत एकजूट आहे.