महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sanjay Raut on Eknath shinde : ...तर एकनाथ शिंदे पाच मिनिटंही मुख्यमंत्री राहणार नाहीत; संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut on Eknath shinde : एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायद्यानं वागले तर एकनाथ शिंदे हे पाच वर्ष नव्हे, तर पाच मिनिटंही मुख्यमंत्री राहणार नाहीत. इतकंच नव्हे तर अजित पवार यांचीही आमदारकी जाईल, असा दावाही संजय राऊतांनी केलाय.

Sanjay Raut on Eknath shinde
Sanjay Raut on Eknath shinde

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 12:32 PM IST

नवी दिल्ली Sanjay Raut on Eknath shinde : जर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर कायद्यानं वागले, तर एकनाथ शिंदे हे पाच वर्ष नव्हे, पाच मिनिटंही मुख्यमंत्री राहणार नाहीत. एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. इतकंच नव्हे तर अजित पवारांचीही आमदारकी जाईल, असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

राज्यात ओनागोंदी माजली :यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, भाजप हा मोठा भाऊ असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीला यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मोठ्या भावाला तडजोडी कराव्या लागत आहेत. सध्या महाराष्ट्रात अनागोंदी सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. राज्यातील रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरू आहे. हे सर्व सुरू असताना सत्ताधारी मात्र रुसव्या फुगव्यात आणि खातेवाटपात अडकले आहेत. हे राज्याचं दुर्दैव आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय.

देवेंद्र फडणवीसांसारखा खोटारडा माणूस पाहिला नाही :माझ्या आयुष्यात मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस पहिला नाही. त्यांच्याकडून फक्त मविआच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. सिंचन घोटाळ्यातील आरोपी तुमच्या शेजारी बसलाय. भंपक माणूस तुम्ही राजभवनात आणून बसवला होता, अशा शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. संजय राऊतांनी यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरही तुफान हल्लाबोल केला. देशाच्या इतिहासात इतके बेकायदेशीर अध्यक्ष झाले नाहीत. त्यांनी कायद्याची भाषा करणं म्हणजे कायद्याचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केलीय.

देशात आणीबाणीसारखी परिस्थिती : आपचे खासदार संजय सिंह यांच्यावरील कारवाईचा आम्ही निषेध करतो. देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या घरी ईडी पोहोचेल, आणीबाणीत जसं नेत्यांना तुरुंगात टाकलं होतं. तसंच निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांना तुरुंगात टाकून हे सरकार निवडणुकीला सामोरे जाईल, असा दावा करत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. तसंच एकनाथ शिंदे स्वतः तपास यंत्रणांना घाबरुन पळून गेल्याचं त्यांनी माझ्यासमोर उद्धव ठाकरेंसमोर कबूल केलंय. त्यांच्याभोवती तपास यंत्रणेचा फास आवळला गेला होता. त्यांच्या जवळच्या बिल्डर आणि सहकाऱ्यांनाही तपास यंत्रणांनी अचानक उचललं होतं. त्यानंतर पक्ष सोडण्याच्या हालचालींना वेग आला, हे सर्वांना माहिती असल्याचं राऊतांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut on Nanded Case : महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू असताना...; 'त्या' प्रकरणावरून राऊतांची सत्ताधाऱ्यांवर जळजळीत टीका
  2. Jumbo Covid Center Scam : जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडी ॲक्शन मोडमध्ये; 8000 हजार पानांच आरोपपत्र दाखल
  3. Sanjay Raut On Rahul Narvekar : राज्यात लोकशाहीचा खून, 'ते' मात्र लोकशाही मजबुतीसाठी विदेशात; संजय राऊतांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details