अयोध्या ( उत्तरप्रदेश ) :शिवसेनेच्या सुहास कांदेंचं मत ( Suhas Kande Vote ) बाद करण्यासाठी मुंबईतून दिल्लीला फोन गेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला ( Sanjay Raut Presidential Election ) आहे. तसंच न्यायालयापासून निवडणूक आय़ोगापर्यंत प्रत्येक यंत्रणा प्रचंड दबावाखाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राऊत सध्या आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त अयोध्येमध्ये आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राऊत म्हणाले की, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. सुहास कांदेंचं मत बाद करण्यापासून अनेक प्रकार या निवडणुकीत करण्यात आले. न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक यंत्रणा स्वतंत्रपणे काम करू शकत नाही, प्रचंड दबावाखाली आहे.