पणजी (गोवा)- गोव्यातील सनातन संस्थेने फेसबुकच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. सनातनचे फेसबुक पेज ब्लॉक केल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सनातन संस्थेच्या तीन फेसबुक पेजपैकी दोन पेज 2011 मध्ये आणि एक पेज 2019 मध्ये तयार केले होते.
न्यायमूर्ती एम.एस. जावळकर आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठासमोर सनातन संस्थेच्या याचिकेची सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, फेसबुक इंडियातर्फे वकिलांनी सनातन संस्थेद्वारे दाखल केलेल्या याचिकेसंबंधी युक्तीवाद करण्यास वेळ मागून घेतली आहे. खंडपीठाने 8 जुलैपर्यंत हा खटला तहकूब केला आहे.
हेही वाचा-सौदी अरेबियामधून भारतात परतण्याकरिता मदत करा; वाहन चालकाची भावनिक हाक
पेज ब्लॉक करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन
सनातन संस्थेने याचिकेमध्ये म्हटले आहे की, फेसबुक पेजवर लेख, हिंदू धर्माविषयी मार्गदर्शन आणि त्यावरील हल्ल्यांबद्दल माहिती आहे. तसेच याचा कोणत्याही व्यवसायिक कामांशी काहीही संबंध नाही. हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे. सनातन संस्थेचे सप्टेंबर 2020 मध्ये फेसबुक पेज ब्लॉक करण्यात आले होते. फेसबुकवरील पेज ब्लॉक करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचा दावा सनातनने केला. केंद्र सरकारच्या अधिकारांवर फेसबुक गदा आणत आहे. कायद्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब न करता भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सनातनने याचिकेमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-नदीतही कोरोना... अहमदाबादच्या साबरमती नदीत सापडला कोरोना विषाणू
8 जुलैपर्यंत खंडपीठाने खटला तहकूब
याचिकाकर्त्याला कोणत्याही प्रकारची संधी न देता त्याचे थेट फेसबुक पेज ब्लॉक करणे हे अन्यायकारक आहे. ते सुधारणे आवश्यक आहे. केवळ न्यायालयाच्या किंवा केंद्र सरकारच्या निर्देशानुसारच फेसबुकला पेज ब्लॉक करण्याचा अधिकार होता, असे सनातन संस्थेने म्हटले आहे. दरम्यान, सनातन संस्थेच्या मते केंद्रही आपल्या मूलभूत हक्काचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. याचिकाकर्त्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणे आणि देशातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र घटनात्मक हक्कांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. वाढती सामाजिक , आध्यात्मिक, धार्मिक आणि देशभक्तीपर कामे पाहता फेसबुक पेज तयार केली जात आहेत. दरम्यान, फेसबुक इंडियातर्फे वकिलांनी सनातन संस्थेद्वारे दाखल केलेल्या याचिकेसंबंधी युक्तीवाद करण्यास वेळ मागून घेतली असून 8 जुलैपर्यंत खंडपीठाने हा खटला तहकूब केला आहे.
हेही वाचा-आंबा, चक्क २ लाख रुपये किलो.. बागेच्या सुरक्षेसाठी ९ श्वान आणि ६ सुरक्षारक्षक
सामाजिक तेढ वाढविणाऱ्या व खोटी माहिती पोस्ट करणाऱ्यांविरोधात फेसबुककडून होते कारवाई-
दरम्यान, नुकतेच फेसबकुने फॅक्ट चेकिंग नोटिफिकेशन समजण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. जर सतत खोटी माहिती पोस्ट केली तर त्या वापरकर्त्याच्या पोस्ट या न्यूजफीडमध्ये कमी दाखविल्या जातात. फेसबुकने म्हटले, की चुकीची माहिती देणाऱ्या पेजेस, ग्रुप्स, इन्स्टाग्राम अकाउंट आणि डोमेन्सवर कठोर कारवाई केलेली आहे. आता, अशा अकाउंटवरही फेसबुककडून कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली होती.