नवी दिल्ली :सॅमसंग (Samsung) कंपनीने आपल्या मालकीच्या उपकरणांवर तसेच कंपनीच्या मालकीच्या नसलेल्या उपकरणांवरही अंतर्गत नेटवर्कवर चालणाऱ्या Chat GPT सारख्या जनरेटिव्ह एआय टूल्स वापराची चांगली कोंडी केली आहे. आमच्या सहकारी इंग्रजी संकेतस्थळाने प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मागील महिन्यात सॅमसंगचा काही प्रमाणात डेटा चुकून चॅटजीपीटीवर लीक झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधीच्या माहितीनुसार, सॅमसंगच्या सेमीकंडक्टर डिव्हिजनने अभियंत्यांना चॅटजीपीटी वापरण्याची परवानगी देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत कामगारांनी कमीतकमी गुप्त माहिती जाहीर (लिक) करण्याच्या घटना तीन वेळा घडल्या आहेत.
सॅमसंगने या बातमीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही : कंपनीने Chat GPT आणि इतर AI सेवा जसे की Microsoft च्या Bing आणि Google's Bard वरील संगणक, टॅबलेट आणि फोनवर बंदी घातली आहे. हा नियम फक्त सॅमसंगने त्यांच्या कामगारांना जारी केलेल्या उपकरणांना लागू होईल, अशीही माहिती समोर आली आहे. सॅमसंग फोन, लॅपटॉप आणि इतर कनेक्टेड डिव्हाइसेसचे मालक असलेले ग्राहक आणि इतर या नियमाने प्रभावित होणार नाहीत. दरम्यान, सॅमसंगने या बातमीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.