महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

SC On Same-Sex Marriage : भारतात समलैंगिक विवाह होणार कायदेशीर? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय - सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

SC On Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा निकाल घटनापीठानं राखून ठेवला होता. या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळं या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

SC On Same-Sex Marriage
देशात समलैंगिक विवाह होणार कायदेशीर? सर्वोच्च न्यायालयात आज होणार निर्णय

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 10:42 AM IST

नई दिल्ली SC On Same-Sex Marriage:समलैंगिक विवाहालाकायदेशीर मान्यता देण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) निकाल देणार आहे. मे महिन्यात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठानं निकाल राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, 20 मे 2023 रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस रविंद्र भट, न्या. हिमा कोहली, न्या. पी एस नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये जवळपास 20 याचिकांवरील सुनावणी करण्यात आली.

आज होणार निर्णय : या प्रकरणाची सुनावणी 11 मे रोजी न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं पूर्ण केली. सुनावणीत याचिकाकर्त्यांनी समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी, असा आग्रह धरला होता. तर केंद्र सरकारनं समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असं म्हटलं होतं. दरम्यान, समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज (17 ऑक्टोबर) सुनावणी होणार असून या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

सरकारचं म्हणणं काय :समलिंगी विवाहालाकेंद्र सरकारकडून विरोध करण्यात येतोय. त्याशिवाय, समलिंगी जोडप्यांना काही अधिकार दिले जाऊ शकतात की नाही हे ठरवणं संसदेचा अधिकार असल्याचं सांगत केंद्र सरकारनं याचिकांना विरोध केला. यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान, खंडपीठानं सांगितलं होतं की, ते केवळ विशेष विवाह कायद्यापुरतेच हे प्रकरण मर्यादित ठेवणार असून वैयक्तिक कायद्यांना स्पर्श करणार नाही.

यांनी केली होती याचिका :या संदर्भात पश्चिम बंगालचे सुप्रियो चक्रवर्ती आणि दिल्लीचे अभय डांग यांनी याचिका दाखल केली आहे. या दोघांनी डिसेंबर 2021 मध्ये हैदराबाद येथे लग्न केलं. तसंच त्यांच्या विवाहाला स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली परवानगी देण्यात यावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीये. तर दुसरी याचिका 17 वर्षापासून सोबत राहत असणाऱ्या पार्थ फिरोज मेहरोत्रा आणि उदय राज यांची आहे. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नसल्यानं संपत्तीच्या अधिकारासह, समलैंगिक विवाह करणाऱ्या व्यक्तींना मूल दत्तक घेता येत नाही, असं त्यांनी याचिकेत म्हंटलं आहे.

हेही वाचा -

  1. Pride Month 2023: LGBTQ+ समुहाच्या विषयावर बनलेले बॉलिवूड चित्रपट
  2. LGBT च्या जीवनावर आधारित आवर्जून पाहावेत असे १० चित्रपट
  3. NALSAR University : नालसार युनिव्हर्सिटीमध्ये LGBTQ+ समुदायासाठी जागा राखीव

ABOUT THE AUTHOR

...view details