महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sunrise Over Ayodhya : खुर्शीद यांच्या पुस्तकावर मध्य प्रदेशमध्ये बंदी घालण्याचा विचार - गृहमंत्री

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद(Salman Khurshid) यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या, नेशनहूड इन अवर टाइम्स'(Sunrise Over Ayodhya) या पुस्तकावर मध्य प्रदेशात बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा(MP Home Minister Narottam Mishra) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Narottam Mishra
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

By

Published : Nov 12, 2021, 3:34 PM IST

भोपाळ - काँग्रेस नेते सलमान खुर्शीद(Salman Khurshid) यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या, नेशनहूड इन अवर टाइम्स'(Sunrise Over Ayodhya) या पुस्तकावर मध्य प्रदेशात बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा(MP Home Minister Narottam Mishra) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. काँग्रेस नेते केवळ हिंदुत्वाची बदनामी करतात. सलमान खुर्शीद यांनीही तेच केले, असेही मिश्रा म्हणाले.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांचं नवं पुस्तक 'सनराईज ओव्हर अयोध्या' वरून आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

हेही वाचा -सलमान खुर्शीदनंतर राशिद अल्वी यांचे वादग्रस्त वक्तव्य, राम भक्तांना संबोधलं दानव

नरोत्तम मिश्रा यांची काँग्रेसवर टीका -

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, खुर्शीद यांनी अत्यंत निंदनीय पुस्तक प्रकाशित केले आहे. काँग्रेस हिंदुत्व तोडण्याची एकही संधी सोडत नाही आणि हिंदूंना जातींमध्ये विभागण्याचे काम काँग्रेस करत आहे. याआधीही कमलनाथ यांनी भारताला बदनाम करण्याबाबतचे वक्तव्य केले होते. तसेच काँग्रेस आमच्या श्रद्धेवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाही.

सलमान खुर्शीद यांच्या वादग्रस्त पुस्तकावर राज्यात बंदी घालण्यात येईल. यासाठी कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे, असेही मिश्रा यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकावरून सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांसोबत केल्याने भाजप आणि शिवसेनेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये सलमान खुर्शीद यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे पुस्तकात ?

सलमान खुर्शीद यांनी Sunrise Over Ayodhya : Nationhood in Our Times या पुस्तकात हिंदुत्वाविषयी टिप्पणी केली आहे. या पुस्तकाच्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची बोको हराम, आयसिसशी तुलना केली आहे. “ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे”, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. हिंदुत्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे.

हेही वाचा -सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकामुळे राजकीय वादंग; हिंदुत्वाविरुध्द केले हे वक्तव्य..

ABOUT THE AUTHOR

...view details