महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Lawrence Bishnoi : सलमान खानसह 10 जण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर, NIA चा खुलासा - लॉरेन्स बिश्नोई सलमान खान

अभिनेता सलमान खानसह 10 जण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने हा खुलासा केला आहे. यावर्षी 11 एप्रिल रोजी सलमान खानला धमकीचा फोन आला होता, त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Lawrence Bishnoi Salman Khan
लॉरेन्स बिश्नोई सलमान खान

By

Published : May 22, 2023, 7:37 PM IST

नवी दिल्ली :गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टारगेटवर अभिनेता सलमान खान तसेच गायक सिद्धू मुसेवालाचा व्यवस्थापक यांच्यासह आणखी 10 जण असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) उघड केले आहे. बिश्नोईने स्वत: एनआयएसमोर ही कबुली दिली आहे.

सलमानच्या घराची रेकीही केली होती : लॉरेन्स बिश्नोई याने सांगितले की, 1998 मध्ये सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती, जो बिश्नोई समाजासाठी पवित्र मानला जातो. बिश्नोई समाजाच्या दुखावलेल्या भावनांचा बदला घेण्यासाठी त्याला सलमानला मारायचे होते, असे बिश्नोईने सांगितले. बिश्नोईने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एनआयएकडे कबुली दिली होती की त्याच्या सूचनेनुसार त्याचा सहकारी संपत नेहरा याने सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाची पाहणी केली होती. नेहराला हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली आहे.

सलमानला वाय प्लस सुरक्षा : यावर्षी 11 एप्रिल रोजी सलमान खानला आणखी एक धमकीचा कॉल आला होती. मुंबई पोलिसांनी सांगितले की, सलमानला धमकीचा ईमेल पाठवल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर सलमान खानला मुंबई पोलिसांनी वाय प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून त्याला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

बिश्नोई तिहार तुरुंगात कैद : बिश्नोई सध्या राजधानी दिल्लीतील तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने कुख्यात गोगी टोळीसाठी गोल्डी ब्रार याच्यामार्फत 2021 साली अमेरिकेतून दोन 'जिगाना' सेमी ऑटोमॅटिक पिस्तूल खरेदी केल्याचीही कबुली दिली आहे. या टोळीच्या सदस्यांनी या वर्षी एप्रिलमध्ये तिहार तुरुंगात टिल्लू ताजपुरियावर हल्ला करून त्याची हत्या केली होती. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गेल्या वर्षी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या कॅनडाच्या गोल्डी ब्रारनेही ताजपुरिया याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

गोगी टोळीनेच अतीकच्या हत्येसाठी शस्त्रे पुरवल्याचा संशय : बिश्नोईने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एनआयएकडे कबुली दिल्यानंतर, गोगी टोळीला त्याने पुरवलेल्या बंदुकांचा वापर माफिया अतीक अहमद आणि त्याच्या भावाच्या हत्येसाठी केल्याचा संशय आहे. अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची 15 एप्रिलच्या रात्री प्रयागराज येथील रुग्णालयात नेत असताना पोलिसांच्या उपस्थितीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

बिश्नोईला गेल्या वर्षी केली होती अटक : अभिनेता सलमान खानच्या कार्यालयातून धमकीचे ईमेल मिळाल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या तुरुंगात असलेल्या गुंडांवरही गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 506 (2), 120 (B) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 18 एप्रिल रोजी, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने खलिस्तान समर्थक संघटनांशी संबंधित दहशतवादी फंडिंग प्रकरणात बिश्नोईची सात दिवसांसाठी एनआयएच्या कोठडीत रवानगी केली होती. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी लॉरेन्स बिश्नोई याला पंजाब पोलिसांनी गेल्या वर्षी अटक केली होती.

हेही वाचा :

  1. Pak FM Bilawal visits PoK : पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची पीओकेला भेट
  2. Satyapal Malik On Lok Sabha Elections : 2019 च्या लोकसभा निवडणुका सैनिकांच्या मुद्द्यावर लढल्याचा सत्यपाल मलिकांचा आरोप
  3. Attack on Media Persons : खासदार अविनाश रेड्डीच्या समर्थकांनी माध्यम प्रतिनिधींवर केला हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details