महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ramcharitmanas Controversy : वादग्रस्त विधानानंतर रामचरितमानसच्या विक्रीत वाढ - Sales of Ramcharitmanas after Controversy

बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानसवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने सध्या खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, गीता प्रेस गोरखपूरच्या व्यवस्थापकानुसार, वादानंतर रामचरितमानसची मागणी वाढली आहे.

Ramcharitmanas
रामचरितमानस

By

Published : Jan 27, 2023, 2:03 PM IST

वादग्रस्त विधानांमुळे रामचरितमानसच्या विक्रीत वाढ

गोरखपूर : गीता प्रेस गोरखपूरचे प्रोडक्ट मॅनेजर लालमणी तिवारी यांनी सांगितले की, 'रामचरितमानस वरून वाद झाल्यानंतर आता या ग्रंथाची मागणी वाढली आहे. मागणी इतकी आहे, त्या प्रमाणे पुरवठा करणे शक्य होत नाही आहे'. गीता प्रेस गोरखपूर एका वर्षात 9 भाषांमध्ये सुमारे 5 लाख रामचरितमानस छापतात. रामचरितमानस या धार्मिक पुस्तकाबाबत सुरू असलेल्या वादग्रस्त विधानांवर गीता प्रेसच्या व्यवस्थापनाने सांगितले की, अशा विधानांमध्ये स्वस्त लोकप्रियता मिळवण्याशिवाय दुसरे काहीच नाही. असे विधान करून विधान करणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्याच्या राजकीय पक्षाचा फायदा होत नाही. अशा वक्तव्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. अशी विधाने करून नेते स्वतःचे व पक्षाचेच नुकसान करतात.

'घराघरात रामचरितमानसचे महत्व' : व्यवस्थापक लालमणी तिवारी यांनी सांगितले की, 'या पुस्तकाचे महत्त्व इतके आहे की अशा वक्तव्यानंतर पुस्तकाची विक्री वाढते. रामचरितमानस अनेकांना कंठाधार आहे. लोकांचे जीवन त्यात वसलेले आहे. लोक स्नान, ध्यान आणि उपासना पाठात याला महत्त्व देतात. लोकांच्या घरातील प्रार्थनास्थळांवर याला प्रमुख धार्मिक ग्रंथ म्हणून स्थान मिळते. अज्ञानी लोकांना यावर केवळ टीका करता येते, जाणकार लोक मात्र याचे पठन करतात'.

स्वामी प्रसाद मौर्य यांचे वादग्रस्त वक्तव्य : बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस या धार्मिक पुस्तकावर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याने सध्या खळबळ उडाली आहे. त्यामुळेच धार्मिक पुस्तकांच्या छपाईसाठी जगप्रसिद्ध असलेल्या गीता प्रेसमधून हा आवाज उठवण्यात आला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानस संदर्भात वादग्रस्त विधान केले असून त्यात त्यांनी रामचरितमानसवर बंदी आणली पाहिजे असे म्हटले आहे.

'रामचरितमानस समाजाला जोडणारा ग्रंथ' :गीता प्रेसचे प्रोडक्ट मॅनेजर डॉ. लालमणी तिवारी म्हणाले की, 'रामचरितमानस हा समाजाला जोडणारा ग्रंथ आहे, तो तोडण्यासाठी नाही. जे लोक अशी विधाने करत आहेत, त्यांच्याबद्दल मला जास्त काही बोलायचे नाही. पण स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी राजकीय वक्तृत्वाशिवाय दुसरे काही नाही असे मी नक्कीच म्हणेन. अशा वक्तृत्वबाजीने या नेत्यांना काही प्रसिद्धी मिळते की नाही हेही मला माहीत नाही, पण मी हे नक्की सांगू शकतो की अशा वक्तृत्वबाजीनंतर लोक केवळ स्वतःचेच नाही तर पक्षाचेही नुकसान करतात.

देश-विदेशातही पुस्तकाला मागणी : लालमणी तिवारी म्हणाले की, हे पुस्तक अतूट प्रेम, सौहार्द आणि मैत्रीचे एक उदाहरण आहे. त्याचबरोबर निषादराज आणि श्रीराम प्रभू यांच्या मैत्रीचाही हा सर्वात मोठा पुरावा आहे. करोडो लोक प्रत्येक घरात रामचरितमानसाचे पठण करतात आणि घरातील मंदिरात ठेवतात. देश-विदेशातही या पुस्तकाला मागणी आहे. यावरून हे सिद्ध होते की रामचरितमानस प्रत्येक घराघरात लोकप्रिय आहे आणि लोकांची त्यावर खूप श्रद्धा आहे. असे असूनही जर कोणी रामचरितमानसवर अशी टिप्पणी करत असेल तर ते हास्यास्पद आहे. जगातील सर्वाधिक धार्मिक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या गीता प्रेस मॅनेजमेंटच्या मते, येथे दरवर्षी २.२५ कोटीहून अधिक धार्मिक पुस्तके प्रकाशित होतात, ज्यामध्ये ५ लाखांहून अधिक रामचरितमानस ९ भाषांमध्ये प्रकाशित होतात. रामचरितमानसच्या काही ओळींवरून नेहमीच वाद होत आले आहेत.

मुळ रामचरितमानस अवधी भाषेत : या संदर्भात लालमणी तिवारी सांगतात की, तुलसीदासांनी रामचरितमानस अवधी भाषेत लिहिला आहे. अवधी भाषा आणि हिंदी भाषेतील शब्दांच्या अर्थांमध्ये बरेच अंतर आहे. उदाहरणार्थ, ताडनाचा अर्थ फक्त मारहाण असा होत नाही. ताडना म्हणजे भोजपुरीमध्ये पाहणे. म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. लोक आपापल्या समजुतीनुसार या श्लोकांचा अर्थ काढतात आणि वादाला जन्म देतात. त्यांना त्याविषयी योग्य व अचूक माहिती मिळवायची असेल आणि हे ग्रंथ वाचायचे असतील, तर केवळ एका श्लोकावर स्वतःच्या अर्थानुसार भाष्य करणे योग्य नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details