नवी दिल्ली -जुन्या अबकारी धोरणानुसार 1 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून दिल्लीत मद्यविक्री होणार आहे. त्यामुळे मद्यपींमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत अनेक दुकाने उघडण्यात आली होती. ती सर्व दुकाने काल म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी बंद करण्यात आली होती. आता दिल्लीच्या कोणत्या भागात, कुठे, कोणती दारू मिळणार, याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. ( New excise policy expired ) या संदर्भात लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून दिल्ली सरकारच्या अंतर्गत उत्पादन शुल्क विभागाने एक मोबाइल अॅप लाँच केले आहे. हे अॅप आजपासून सुरू झाले आहे. हे मोबाइल अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करता येते.
ड्राय डे निश्चित केले - मोबाईल अॅपच्या माध्यमातून दिल्लीत सध्या कुठे दारूची दुकाने सुरू आहेत याची क्षेत्रवार माहिती बघता येईल. कोणत्या ब्रँडची दारू उपलब्ध आहे? तुम्ही त्याची माहिती देखील पाहू शकाल. सरकारने किती ड्राय डे निश्चित केले आहेत, याचीही माहिती वेळोवेळी मिळणार आहे. तसेच, तुम्हाला दारूच्या बाटल्या, खऱ्या की बनावट आढळल्यास, हे देखील अॅपद्वारे स्कॅन केले जाईल. दारूची दुकाने किती दिवस सुरू राहतील याची माहिती अॅपवर पाहता येईल. विदेशी दारू कुठे मिळते? तुम्हाला ही माहिती अॅपपद्वारे पाहता येणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही दारू दुकानाची गुणवत्ता इत्यादीबाबत विभागाला सुचवायचे असल्यास त्याची सुविधाही अॅपमध्ये उपलब्ध असेल.