मुंबई - माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा दानशूरपणा दाखविला आहे. त्याने शेतकऱ्याची मुलगी दिप्ती विश्वासरावला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मदत केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील झायरे गावात राहणारी दिप्ती विश्वासराव ही डॉक्टर होण्यासाठी सज्ज झाली आहे. धन्यवाद@sachit_rt वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होत आहे. दीप्ती आणि अेक विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हे ट्विट सेवा सहयोग फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने केले आहे.
शेतकऱ्याच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण हेही वाचा-नवीन आयटी कायद्याची अंमलबजावणी करा, दिल्ली उच्च न्यायालयाची ट्विटरला अखेरची संधी
विद्यार्थिनी दिप्तीने शेअर केला व्हिडिओ-
ट्विटमध्ये दिप्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिप्तीने सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहे. तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे, सध्या, मी अकोलामधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. माझ्या कुटुंबात माझ्यासह आई-वडील आणि लहान भाऊ आहे. वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. कोणीतरी म्हटले आहे, कष्ट हा यशाची किल्ली आहे. शेवटी कष्टाचे फळ मिळाले. मला सरकारी वैद्यकीय रुग्णालयात सीट मिळाली आहे. मला ही शिष्यवृत्ती दिल्याबद्दल सचिन तेंडुलकर फाउंडेशनचे आभार व्यक्त करते.
हेही वाचा-कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासमोरील आव्हाने व राजकीय पार्श्वभूमी
दीप्तीचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी-
सचिन तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या स्वप्नाचा पाठलाग करताना आणि ते प्रत्यक्षात अस्तित्व आणण्याबाबत दीप्तीचा प्रवास हा उज्जवल उदाहरण आहे. तिची स्टोरी ही अनेकांना काम करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. दिप्तीच्या भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा, असे सचिनने म्हटले आहे.