महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sabarimala Temple Revenue : सबरीमाला मंदिराची 10 दिवसांत रेकॉर्ड कमाई ! - 10 दिवसांत 52 कोटी रुपये दान

हंगामाच्या 10 दिवसांत 52 कोटी रुपये दान (Sabarimala Temple revenue) आले असल्याचे देवस्वोम बोर्डाचे अध्यक्ष अॅडव्होकेट के अनंतगोपन यांनी सांगितले. मागील वर्षी या कालावधीत कठोर कोविड निर्बंध असल्यामुळे हा महसूल केवळ 9.92 कोटी रुपये एवढा होता. (Sabarimala Temple revenue of 52 Cr).

Sabarimala Temple Revenue
Sabarimala Temple Revenue

By

Published : Nov 28, 2022, 8:46 PM IST

पठाणमथिट्टा (केरळ) : यावर्षीचा सबरीमाला यात्रेचा हंगाम (Sabarimala Temple pilgrim season) सुरळीत सुरू असून मंदिराला आत्तापर्यंत 50 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. हंगामाच्या 10 दिवसांत 52 कोटी रुपये दान आले असल्याचे देवस्वोम बोर्डाचे अध्यक्ष अॅडव्होकेट के अनंतगोपन यांनी सांगितले. (Sabarimala Temple revenue of 52 Cr). मंदिराला 'आप्पे'च्या विक्रीतून 2.58 कोटी रुपये, 'अर्वण पायसम'च्या विक्रीतून 23.57 कोटी रुपये आणि हुंडीचा महसूल म्हणून 12.73 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी या कालावधीत कठोर कोविड निर्बंध असल्यामुळे हा महसूल केवळ 9.92 कोटी रुपये एवढा होता. (Sabarimala Temple revenue)

दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगही शक्य : अनंतगोपन म्हणाले की, महोत्सवाच्या आयोजनासाठी बहुतांश महसूल वापरला गेला आहे. ते म्हणाले की, मंदिराकडे जाणारे चारही मार्ग खुले करण्यात आले आहेत. भक्त त्यांच्या आवडीचा कोणताही मार्ग निवडू शकतात. जे भाविक सबरीमाला मंदिरात जाण्यास इच्छुक आहेत ते ऑनलाइन पोर्टलद्वारे किंवा स्पॉट बुकिंगद्वारे दर्शन बुक करू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details