नवी दिल्ली/ मॉस्को - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. तुमच्या हातात सत्ता घ्या, असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी ( Russia Ukraine crisis updates ) युक्रेनच्या सैन्यदलाला आवाहन केले आहे. पुतीन यांनी यापूर्वीच युक्रेनविरोधात कारवाई करण्याचे ( Russia Declares War On Ukraine ) करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत.
युक्रेनमधून आमच्या नागरिकांना त्वरित आणावे, अशी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आमचा विश्वास आहे, की सरकार त्याप्रमाणे काहीतरी नियोजन करेल, आम्हाला त्याची केंद्र सरकार माहिती सांगेल, असे ठाकरे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ संघटनेचा झटका; 44 वी ऑलिम्पियाड बुद्धीबळ स्पर्धेचे रशियात होणार नाही आयोजन
युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाविरोधात जगभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 44 व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड ( the 44th Chess Olympiad ) आणि दिव्यांग, फिडे काँग्रेस (FIDE Congress ) या बुद्धीबळ स्पर्धांचे रशियात आयोजन करण्याचा निर्णय जागतिक बुद्धीबळ संघटनेने ( International Chess Federation Council ) घेतला आहे.
शस्त्र खाली टाकत युक्रेनने आत्मसमर्पण करावे, असे रशियानेम्हटले आहे. पुतीन यांच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमी पुतीन ( Russian President Vladimir Putin ) यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध ( USA protest Russian war against Ukraine ) नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली.
हेही वाचा-War Affected Areas In Ukraine : युक्रेन रशिया युद्धाची भीषणता : पाहा VIDEO
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 'लुगान्स्क पीपल्स रिपब्लिक (Lugansk Peoples Republic )' आणि 'डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक ( Donetsk Peoples Republic )' यांना स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता देणाऱ्या दोन आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. डोनेस्तक आणि लुगान्स्क ही युक्रेनमधील दोन राज्ये आहेत. येथील रशियन समर्थक फुटीरतावाद्यांनी युक्रेन सरकारविरुद्ध युद्ध पुकारले आहे. गेल्या दिवसांपासून ते युक्रेनपासून वेगळा स्वतंत्र देश होण्याच्या प्रयत्नात होते. गेल्या आठ वर्षांपासून युक्रेनचे सैन्य या फुटीरतावाद्यांशी लढत आहे.
हेही वाचा-Russia Ukraine Crisis : UNSC मध्ये युक्रेनचा प्रश्न ऐरणीवर; रशियावरील ठरावावर आज मतदान
युक्रेनचे महत्त्व -
युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होऊ शकते.