किव्ह -रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज ३६ वा दिवस आहे. यामध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा झाली असली तरी अनेक देशांचा रशियावर विश्वास नाही. दरम्यान, युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, रशियन सैन्याने आपल्या देशाच्या पूर्व भागात आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. (russian president vladimir putin) युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की रशियाने खार्किवच्या दक्षिणेकडील इझुमजवळ आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. रशियन सैन्याने पूर्व डोन्स्क भागात बॉम्बफेक आणि हल्ले तीव्र केले आहेत. असही सांगण्यात आले आहे.
युद्धाची व्याप्ती वाढू शकते - युद्धाच्या दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नॉर्वेच्या संसदेला संबोधित करताना म्हटले, की रशियाला युरोपचा पाया नष्ट करायचा आहे. येथे, झेलेन्स्की यांनी युक्रेनला लष्करी लढाऊ विमाने उपलब्ध करून देण्याची विनंती बायडेन प्रशासन आणि इतर पाश्चात्य देशांना केली आहे. (Russia-Ukraine War 36th Day) तथापि, यूएस आणि इतर उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) देश अजूनही त्या विनंतीला स्वीकारण्यास तयार नाहीत. कारण यामुळे युद्धाची व्याप्ती वाढू शकते.
युक्रेनच्या संसद सदस्यांना संबोधित केले - नॉर्वेच्या 169 सदस्यीय संसद स्टॉर्टिनजेट संबोधित करताना झेलेन्स्की यांनी बुधवारी सांगितले, की युरोपचे भविष्य आता निश्चित केले जात आहे. युक्रेनमधील रशियन लष्करी हालचालींबद्दल बोलताना झेलेन्स्की म्हणाले, की येथे रशियासाठी कोणतेही प्रतिबंधित लक्ष्य नाहीत. झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या संसद सदस्यांना संबोधित केले. याआधी त्यांनी अमेरिका, यूके, स्वीडन, जर्मनी, कॅनडा, इस्रायल, जपान आणि युरोपियन युनियनला संबोधित केले आहे.
रूस के साथ सहयोग की कोई सीमा नहीं: चीन -युक्रेन युद्धादरम्यान बीजिंगला भेट देणारे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्हचे यजमानपद भूषवत चीनने बुधवारी सांगितले की दोन्ही मित्र राष्ट्रांमधील सहकार्याला कोणतीही सीमा नाही. रशियाची सरकारी वृत्तसंस्था 'टास'च्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानवरील परराष्ट्र मंत्र्यांच्या तिसर्या बैठकीसाठी लावरोव पूर्व चीनच्या अनहुई प्रांतातील तुन्शी येथे पोहोचले.