किव - रशियन सैन्याने शनिवारी युक्रेनच्या मारियुपोल बंदरातील एका स्टील प्लांटवर हल्ला केला. ऑर्थोडॉक्स इस्टरच्या पूर्वसंध्येला झालेल्या कथित हल्ल्यानंतर, क्रेमलिनने दावा केला की त्यांच्या सैन्याने अझोव्स्टल प्लांट वगळता संपूर्ण मारियुपोल ताब्यात घेतला आहे, आणि रशियन सैन्याने दक्षिण आणि पूर्व युक्रेनमधील इतर शहरांवर देखील हल्ला केला. ( Russia Ukraine War 60Th Day ) त्याच वेळी, युक्रेनच्या अधिकार्यांनी सांगितले की रशियाने ओडेसा या काळ्या समुद्रातील बंदर शहरावर किमान सहा क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्याचा उद्देश युक्रेनियन प्रतिकाराचा शेवटचा किल्ला मार्युपोल या शहरावर ताबा मिळवण्याचा आहे.
पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोविच यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. उर्वरित युक्रेनियन सैन्यासह सुमारे 1,000 नागरिक अझोव्हस्टल प्लांटमध्ये आश्रय घेत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, युक्रेनने केलेल्या जोरदार प्रत्युत्तरादाखल रशियन सैन्याने डॉनबास प्रदेशात आपले आक्रमण तीव्र केले. ( Russian army renews attack on Mariupol ) एरास्टोविच यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रशियन सैन्याने समुद्रकिनाऱ्यावरील विशाल प्लांटवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले आहेत. ते म्हणाले, "शत्रू अजोवास्तल भागातील मारियुपोलच्या बचावकर्त्यांचा प्रतिकार पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न करीत आहे असही ते म्हणाले आहेत.0
रशियन लष्कराची प्रतिक्रिया नाही - युक्रेनच्या लष्कराने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी खेरसनमधील रशियन कमांड पोस्ट नष्ट केली. हे दक्षिणेकडील शहर युद्धाच्या सुरुवातीला रशियन सैन्याने ताब्यात घेतले होते. ( 60 days of Ukraine war ) युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, कमांड पोस्टवर शुक्रवारी हल्ला झाला, त्यात दोन जनरल ठार झाले आणि एक गंभीर जखमी झाला. ओलेक्सी अरेस्टोविच यांनी एका ऑनलाइन मुलाखतीत सांगितले की, हल्ल्याच्या वेळी कमांड सेंटरमध्ये 50 वरिष्ठ रशियन अधिकारी उपस्थित होते. मात्र, रशियन लष्कराने या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.