मेव्हिल द सॅटॅनिक व्हर्सेसचे वादग्रस्त लेखक सलमान रश्दी Indian author Salman Rushdie यांचे शनिवारी व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले. ते आता बोलू शकत आहेत. रश्दी यांच्यावर न्यू यॉर्कमधील एका कार्याक्रमात व्याख्यान देण्याच्या तयारीत असताना हल्ला झाला होता. रश्दी यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. सहकारी लेखक आतिश तासीर यांनी संध्याकाळी ट्विट केले की त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे. ते बोलत आहेत Rushdie talking day after attack आणि विनोदही करत आहेत.
प्राणघातक हल्ला शुक्रवारी चौटौका इन्स्टिट्यूट, नानफा शिक्षण आणि रिट्रीट सेंटर येथे शुक्रवारी त्यांच्यावर हल्ला झाला होता. आरोपीला लगेचच ताब्यात घेण्यात आले होते. या हल्ल्यानंतर रश्दी यांना तातडीने हेलीकॉप्टरने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.