दिवाळीमध्ये पुण्यातील रस्त्यावर फटाके फोडण्यास बंदी - undefined
14:10 October 27
या कालावीमध्ये करता येईल फटाक्यांची विक्री
दिवाळीनिमित्त पोलिस आयुक्त कार्यालयाकडून तात्पुरते फटाके विक्री परवाने देण्यात आले आहेत. २७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर या कालावधीसाठी हे परवाने वैध असतील. या कालावधीत विक्रेत्यांना विदेशी फटाक्यांची विक्री करता येणार नाही.
मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेच्या दारूची विक्री करता येणार नाही. शिल्लक राहिलेले फटाके किंवा साठा हा परवाना असलेल्या गोदामात किंवा घाऊक परवाना असलेल्यांकडे परत करणे आवश्यक असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.
ज्या ठिकाणी तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात आली आहे, तेथे ५० मीटरच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
असे आहेत नियम...
ध्वनिप्रदूषण करणाच्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांवर प्रामुख्याने बंदी असणार आहे. १०५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या तसेच १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाका उत्पादन विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णतः बंदी असणार आहे. मात्र, जे फटाके आवाज न करता रंग निर्माण करतात, त्यांच्यावर बंदी नसेल. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये या शांतता प्रभागासभोवतालच्या १०० मीटरपर्यंत कोणत्याही फटाक्यांचा वापर करता येणार नाही. पोलिस आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करून अपघात व धोका होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
असा करता येईल आर्ज
आगामी दिवाळीत फटाके विक्रीचे परवाने मिळण्यासाठी १व्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केले आहे. हे परवाने मावळ व मुळशी तालुक्यातील पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरील क्षेत्रासाठी असतील.
अर्जासोबत १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प आवश्यक आहे. व्यवसाय करावयाच्या जागेचा मिळकत नोंदणी उतारा अथवा जागा दुसऱ्याची असेल तर जागेचा वापर करण्यास संबंधिताचे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र, पोलिस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक यांचे दंड किंवा शिक्षा झाली आहे का याबाबतचे प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र व्यवसायाची जागा सुरक्षित असल्याबाबतचे प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील स्टॉलबाबत नगरपालिकेने दुकानासाठी जागा दिल्याच्या पत्राची प्रत मागील वर्षी फटाका स्टॉल परवाना घेतला असल्यास त्याची प्रत, परवाना शुल्क सहाशे रुपये शासकीय कोषागारात जमा करून त्याचे मूळ चलन जोडावे.
शोभेची दारू व फटाके विक्रीची मुदत ८ नोव्हेंबर पर्यंत राहील. मुदत संपल्यानंतर परवानाधारकांनी शिल्लक माल जवळ ठेवू नये. उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, स.नं. २३. बावधन बु. ता. मुळशी (जि. पुणे) यांच्यामार्फत हा परवाना देण्यात येणार आहे. दुकानापासून १०० मीटर परिसरात कोणीही धूम्रपान करू नये, दुकानापासून १०० मीटर परिसरा दारूकाम करू नये, फटाके उडवू नयेत. शोभेच्या दारूचे रॉकेट परीक्षणासाठी उडवू नयेत, असे आदेशही दिले आहेत.
TAGGED:
Pune