कानपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (RSS CHIEF MOHAN BHAGWAT) यांनी मंगळवारी नवाबगंज येथील पं. दीनदयाळ उपाध्याय सनातन धर्म विद्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी दिवसभरातील तीन वेगवेगळ्या सत्रात कुटुंब प्रबोधन, सेवा कार्य आणि इतर अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की, 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. (100 years of RSS). शताब्दी वर्ष पूर्ण होताच प्रत्येक प्रांतातील प्रत्येक गावात शाखा स्थापन करावी. तसेच मंदिर, स्मशानभूमी, जलाशय इत्यादींवर संपूर्ण हिंदू समाजाचा समान अधिकार असावा.
Mohan Bhagwat: जातिवादाने समाजाचा नाश; मंदिर, स्मशानभूमी, जलाशय इत्यादींवर संपूर्ण हिंदू समाजाचा समान अधिकार - मोहन भागवत - सरसंघचालक मोहन भागवत
सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मंगळवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय सनातन धर्म विद्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी जन्मत: सर्व समान असून जातिवादाने समाजाचा नाश होतो, असे म्हटले.
जन्मत: सर्व समान: भागवत म्हणाले, "जातिवाद हा समाजाचा नाश करणारा आहे. जन्मत: कोणीही लहान-मोठा नसतो, सर्व समान असतात, सर्व जाती राष्ट्रहितासाठी योगदान देत आहेत. अशी कोणतीही जात नाही जिथे महापुरुष जन्माला आले नाहीत." संघप्रमुख पुढे म्हणाले की, घोष शिबिरा दरम्यान हवामान जरी प्रतिकूल होते तरी स्वयंसेवकांनी वाद्ये वाजवण्याचा जोरदार सराव केला. ही कसरत अखंड चालू राहिली तरंच शिबिराचं सार्थक होईल. तसेच पहिल्या सत्रात कुटूंब प्रबोधनच्या कार्यकर्त्यांनी प्रांतात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती संघप्रमुखांसमोर मांडली असता, संघप्रमुखांनी त्यांना अजून काम वाढवण्यास सांगितले. संघप्रमुख म्हणाले की, प्रत्येक कुटुंब सुसंस्कृत असले पाहिजे. कुटुंबाची व्याख्या संकुचित नसावी. कुटुंब म्हणजे काका, काकू, आजोबा, आजी इत्यादी सर्व आहेत.
सर्व एकाच भारत मातेची लेकरे: त्याचवेळी दुसऱ्या सत्रात सेवा विभागातील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत संघप्रमुखांनी प्रांतातील 215 सेवा वसाहतींमध्ये 15 प्रकारची सेवा कार्ये सुरू असल्याचे सांगितले. यामध्ये शिलाई केंद्र, संस्कार केंद्र आदींचा समावेश आहे. संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले, 'आम्ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनेचे स्वयंसेवक आहोत. समाजाचे दुख हे आमचे दु:ख आहे. समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती होवो आणि जातीवादाची मानसिकता समूळ नष्ट व्हावी अशी आमची इच्छा आहे. आपण सर्व एकाच भारत मातेची लेकरे आहोत, म्हणूनच आपण सर्व भावंडे आहोत, असे ते शेवटी म्हणाले.