बेंगळुरू: आरएसएस प्रमुख मोहन भागवत ( rss chief mohan bhagwat ) यांनी श्री सत्य साई विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. तेथील भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. धर्मांतराचाही उल्लेख करण्यात आला आणि लोकसंख्येवरही मोठे विधान केले गेले. ते पुढे म्हणाले की, देशाच्या प्रगतीची चिन्हे आता सर्वत्र दिसू लागली आहेत. चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील मुद्देनहल्ली येथील सत्य साई गावात ‘श्री सत्य साई विद्यापीठ फॉर ह्युमन एक्सलन्स’ च्या पहिल्या दीक्षांत समारंभात भागवत म्हणाले, “भारत पुढे जाईल असे १०-१२ वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते, तर आम्ही ते गांभीर्याने घेतले नसते."
पराक्रमी लोकच टिकतील :मोहन भागवत म्हणाले की, जिवंत राहणे हे जीवनाचे ध्येय असू नये. मानवाची अनेक कर्तव्ये आहेत, जी त्याने वेळोवेळी करत राहिली पाहिजेत. अन्न खाणे आणि लोकसंख्या वाढवने ( Mohan Bhagwat on Population Growth ) हे काम तर प्राणीही करू शकतात. पराक्रमी लोकच टिकतील, हा जंगलाचा नियम आहे. त्याच वेळी, जेव्हा शक्तीशाली इतरांचे रक्षण करू लागतात, तेव्हा ते मानवाचे लक्षण आहे. ते म्हणाले की, राष्ट्रत्वाची प्रक्रिया लगेच सुरू झाली नाही, ती 1857 पासून आहे, जी स्वामी विवेकानंदांनी पुढे नेली. विज्ञानाला अद्याप सृष्टीचा उगम समजला नसल्यामुळे अध्यात्मिक माध्यमातून उत्कृष्टता साधता येते, असे संघप्रमुख म्हणाले.