महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

54 Cr Heroine Seized : हैदराबाद एअरपोर्टवर 54 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त - शामशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५४ कोटींचे ड्रग्ज जप्त

हैदराबादमधील शामशाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली ( Drugs worth Rs 54 crore seized ) आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या पाच महिलांकडून कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ५४ कोटींचे हेरॉईन जप्त केले ( Drugs seized at Shamshabad airport ) आहे.

Drugs worth Rs 54 crore seized at Shamshabad airport
हैदराबाद एअरपोर्टवर 54 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

By

Published : May 7, 2022, 1:08 PM IST

हैदराबाद ( तेलंगणा ) : हैदराबादमधील शमशाबाद विमानतळावर आणखी एक मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या पाच महिलांच्या बॅगमधून कस्टम अधिकाऱ्यांनी 6.75 किलो हेरॉईन जप्त ( Drugs worth Rs 54 crore seized ) केले. जोहान्सबर्ग येथून एक महिला प्रवासी शुक्रवारी शमशाबाद विमानतळावर ( Drugs seized at Shamshabad airport ) पोहोचले.

एअर इंटेलिजेंस युनिट, हैदराबाद कस्टम अधिकाऱ्यांनी तिचे सामान तपासले कारण ती संशयास्पद दिसली. तिने आणि इतर चौघांनी परिधान केलेल्या बॅगची तपासणी केली असता दोन फाईल फोल्डर आढळून आले. त्यांनी फोल्डर उघडले असता त्यांना काळ्या प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या.

बॅगचे थर तपासले असता एकूण 6.75 किलो हेरॉईन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 54 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : Honour killing In Hyderabad : परवानगीशिवाय लग्न केल्यामुळे तरुणीच्या कुटुंबाकडून पतीची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details