महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rs 23 Crores of the amount : एचडीएफसीच्या दोन ग्राहकांच्या  खात्यावर जमा झाले 23 कोटी - मोबाईल शॉपी चालक कोट्यधीश

विकाराबाद येथील व्यंकट रेड्डी नावाचा मोबाईल शॉपी ( Venkat Reddy from vikarabad ) मालक आहेत. त्यांचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. रविवारी सकाळी त्यांच्या खात्यात 18 कोटी 52 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर काही वेळातच त्यांचे खातेही बंद करण्यात आले. एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाल्याने व्यंकट रेड्डी आश्चर्यचकित झाले. त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क ( HDFC account holder ) साधला.

एचडीएफसी
एचडीएफसी

By

Published : May 30, 2022, 7:18 PM IST

Updated : May 30, 2022, 8:59 PM IST

हैदराबाद- तेलंगणात दोन बँक खातेदार रातोरात कोट्याधीश ( Crorepati overnight in Telangana ) झाले. त्यांच्या बँकेच्या खात्यात कोट्यवधींची रोकड जमा झाले आहेत. पैसे बँक खात्यावर जमा झाल्याचा त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. सुरुवातीला त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्यांनी पुन्हा मेसेज तपासला. तेव्हा त्यांना खात्यात कोट्यवधी रुपयांची रोकड ( crores of rupees of cash in accounts ) जमा झाल्याची खात्री पटली.

मोबाईल शॉपी चालकाच्या खात्यावर 18 कोटी 52 लाख जमा-विकाराबाद येथील व्यंकट रेड्डी नावाचा मोबाईल शॉपी ( Venkat Reddy from vikarabad ) मालक आहेत. त्यांचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. रविवारी सकाळी त्यांच्या खात्यात 18 कोटी 52 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर काही वेळातच त्यांचे खातेही बंद करण्यात आले. एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाल्याने व्यंकट रेड्डी आश्चर्यचकित झाले. त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क ( HDFC account holder ) साधला. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याचे पैसे नसल्याचे सांगितले. तसेच बँक खात्यातून व्यवहार करू शकणार नसल्याचे सांगितले.

पेड्डापल्ली जिल्ह्यातील मोबाईल शॉप चालकाच्या खात्यावर 5 कोटी 68 लाख जमा-पेड्डापल्ली जिल्ह्यातील मंथनी शहरात, मोबाईल शॉप मालक इलेंडुला साई यांच्या खात्यात ( manthani town in Peddapalli ) पूर्वी १०,००० रुपये होते. त्यांच्या खात्यात 5 कोटी 68 लाख रुपये जमा झाले आहेत. रविवारी सायंकाळी ७ वाजता पैसे जमा करण्यात आले. ते सुमारे 5 तास त्यांच्या खात्यात जमा राहिले. त्यानंतर सर्व रोकड पुन्हा गायब झाली. आज सकाळी साई यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकार घडला असावा, असे त्यांनी सांगितले.

Last Updated : May 30, 2022, 8:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details