हसन (कर्नाटक) : विधानसभा निवडणूक (२०२३)च्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मोठी घोषणा केली आहे. जेडीएस हा शेतकऱ्यांचा पक्ष असल्याचे एचडी कुमारस्वामी यावेळी म्हणाले आहेत. प्रादेशिक पक्षाशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही असही ते म्हणाले आहेत. यावेळी आमचा पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना दोन लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल अशी अगळी-वेगळी घोषणा कुमारस्वामी यांनी केली आहे. हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे येथे आयोजित पंचरत्न यात्रा संमेलनात कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली.
2 लाख प्रोत्साहनपर रक्कम : शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. मी पाहिलं की शेतकऱ्यांच्या अविवाहित तरुणांनी चामराजनगर जिल्ह्यातील माले महाडेश्वर टेकडीवर लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभमीवर शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आमच्या पंचरत्न यात्रेच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे असही ते म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख प्रोत्साहनपर रक्कम देण्याची महत्त्वाची योजना आम्ही राबवणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
मी गरीबांच्या समस्या पाहिल्या आहेत : 'आम्ही सत्तेत असलो किंवा नसो, आम्ही कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर दबाव आणला नाही. आरोप करणाऱ्यांनी हे आरोप आधी का केले नाहीत? आमच्या पक्षाकडे निधीची कमतरता आहे हे खरे आहे. चांगले लोक पक्षाच्या भल्यासाठी पैसे देतात. तुम्ही ते पैसे स्वत:कडे ठेवू शकत नाहीत. तसेच, ते आनंदात आणि घरीही खर्च करू शकत नाहीत. दरम्यान, मी गरीबांच्या समस्या पाहिल्या आहेत. त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी मी पंचरत्न रथयात्रा करत आहे असही कुमारस्वामी म्हणाले आहेत.