बेरहामपूर (ओडिसा) : आसाममधून एक प्रवासी चेन्नईला जात होता. स्टेशनवर उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो फरफटत गेला. तो ट्रेनखाली जाईल अशी स्थिती असतानाचा सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेल ओढले. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होताना टळला आहे. ही घटना रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला. दरम्यान, प्लॅटफॉर्मवर कर्तव्य बजावत असताना आरपीएफ हवालदार सूर्यकांत साहू यांनी वेळीच पाहिले आणि त्यांनी प्रवाशाचा जीव वाचवला.
जयशंकर मुंडा असे तरुणाचे नाव : व्हिडिओमध्ये पॅसेंजर ट्रेनच्या आगमनावेळी एक आरपीएफ जवान स्टेशनवर उभा असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एका तरुणाने चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो खाली पडतो. तो पुर्णपणे ट्रेनखाली जाईल अशी स्थिती निर्माण झालेली असते. ट्रेनचा वेगही खूप असतो. त्याचवेळी प्रसंगावधान राखत आरपीएफ जवानाने त्याला पाहिले. त्याने लगेच तिचा जीव वाचवला. जयशंकर मुंडा असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ३४ वर्षीय जयशंकर आपल्या कुटुंबासह चेन्नईला जात होते.