महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bullet Bike Blast : नवीन बुलेट घेऊन पोहोचला मंदिरात; अचानक पेट घेतल्याने झाला बुलेटचा स्फोट - कसापुरम नेट्टीकांती बुलेट आग

रविचंद्र हा भाविक म्हैसुर येथील कासपुरम येथून बुलेटने मंदिरात दर्शनासाठी आला होता. तेलुगु नवीन वर्ष सुरू ( Ugadi year celebration ) असल्याने त्याने नवीन बुलेट खरेदी केली होती. मंदिरासमोर त्याने लावलेल्या बुलेटने अचानक पेट घेतला. त्यानंतर बुलेटमधील पेट्रोलमुळे आगीचा भडका उडून स्फोट ( bullet suddenly ignited ) झाला.

आग दुर्घटना
आग दुर्घटना

By

Published : Apr 4, 2022, 8:02 PM IST

Updated : Apr 4, 2022, 8:27 PM IST

अमरावती ( आंध्रप्रदेश ) - बुलेटप्रेमींना धक्का देणारी घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. कसापुरम नेट्टीकांती ( Kasapuram Nettikanti ) जिल्ह्यातील अंजनेय स्वामी मंदिरासमोर ( Anjaneya Swamy Temple ) बुलेटने अचाकन पेट घेतला. या घटनेत बुलेट जळून खाक झाली आहे.

रविचंद्र हा भाविक म्हैसुर येथील कासपुरम येथून बुलेटने मंदिरात दर्शनासाठी आला होता. तेलुगु नवीन वर्ष सुरू ( Ugadi year celebration ) असल्याने त्याने नवीन बुलेट खरेदी केली होती. मंदिरासमोर त्याने लावलेल्या बुलेटने अचानक पेट घेतला. त्यानंतर बुलेटमधील पेट्रोलमुळे आगीचा भडका उडून स्फोट ( bullet suddenly ignited ) झाला.

बुलटेच्या आगीनंतर स्थानिकांनी पोलीस व अग्नीशमन दलाला माहिती दिली. अग्नीशमन दलाने आग वेळेवर विझविल्याने दुसऱ्या दुचाकी आगीपासून वाचू शकल्या आहेत. अंजनेय स्वामी मंदिरात दरवर्षी उगादी सण साजरा करण्यासाठी हजारो भाविक येतात. या आगीच्या घटनेने भाविकांमध्ये भीती निर्माण झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली आहे.

अचानक पेट घेतल्याने झाला बुलेटचा स्फोट
Last Updated : Apr 4, 2022, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details