महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Royal Enfield Bullet 350 Launch : रॉयल एनफिल्डचं नवीन मॉडेल भारतीय बाजारात दाखल, क्लासिक बुलेटपेक्षा नविन दुचाकीची किंमत कमी - नवीन रॉयल एनफील्ड बुलेट

Royal Enfield Bullet 350 Launch : नवीन फीचरसह Royal Enfield 350 दुचाकी आज लाँच करण्यात आली आहे. नवीन दुचाकी नवीन लुकसह आज भारतीय बाजारात दाखल झाली. विषेष म्हणजे ही दुचाकी तीन रंगात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (Royal Enfield Bullet 350 Launch)

Royal Enfield Bullet Launch
Royal Enfield Bullet Launch

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 5:38 PM IST

नवी दिल्ली Royal Enfield Bullet 350 Launch: रॉयल एन्फिल्डनं आज भारतीय बाजारात नवीन Bullet 350 लाँच केलीय. ही दुचाकी तीन प्रकारांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ही दुचाकी तीन रंगात उपलब्ध आहे. ज्यात लाल, काळ्या तसंच सोनेरी रंगाचा समावेश आहे. (Royal Enfield 350)

क्लासिक बुलेटपेक्षा किंमत कमी : रॉयल एनफील्डनं आज आपली सर्वात लोकप्रिय दुचाकी नवीन लुकसह लॉन्च केली आहे. या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत १ लाख ७३ हजार ५६२ रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय, मिड-लेव्हल व्हेरिएंटची किंमत १.९७ लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 2.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मिलिटरी, स्टँडर्ड आणि ब्लॅक गोल्ड अशी या तीन प्रकारांची नावं आहेत. नवीन रॉयल एनफील्ड बुलेट ३५० मध्ये ३४९cc एअर-ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन दिलं आहे. जे आधीपासून Meteor, Classic आणि Hunter 350 मॉडेल्समध्ये दिलेलं आहे. या दुचाकीला ५-स्पीड गिअरबॉक्स दिलेला आहे.

नवीन बुलेटचं डिझाइन :क्लासिक बुलेट ३५० चं डिझाईन कायम ठेवत नवीन बुलेटमध्ये नवीन हेडलाइट, तसंच टेललाइट देण्यात आली आहे. याशिवाय त्याची फ्रेम, इंजिन तसंच सीट डिझाईन, हँडल, रिअर फेंडर इत्यादींमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. नवीन बाईकमध्ये एलसीडी स्क्रीन, नवीन हँडलबार, स्विचगियर, यूएसबी पोर्टसह नवीन डिजिटल-ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. टॉप-स्पेक व्हेरियंटमध्ये इतर भागांसह ब्लॅक-आउट इंजिन देखील देण्यात आलं आहे. यावेळी, नवीन बुलेटचंलाँग-स्ट्रोक इंजिन २०.२ बीएचपी पॉवर, २७ एनएम टॉर्क निर्माण करतं. बुलेट ३५० ला नवीन ५-स्पीड गिअरबॉक्ससह जोडण्यात आलं आहे. बाईकच्या स्पेसिफिकेशनमध्ये सिंगल चॅनल एबीएस देण्यात आला आहे. दुचाकीला 135 mm ग्राउंड क्लीयरन्स देखील देण्यात आला आहे.

नवीन बुलेट ३५० चं बुकिंग सुरू :कंपनीनं आजपासून आपल्या नवीन बुलेट ३५० चं बुकिंग सुरू केलं आहे. नवीन बुलेट क्लासिक बुलेटपेक्षा १९,००० रुपयांनी स्वस्त आहे. मात्र बुलेटचं दुसरं माॅडलं हंटर ३५० पेक्षा २४ हजार रुपयांनी महाग आहे. या दुचाकीला ३००mm डिस्क ब्रेक देखील देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details