नवी दिल्ली न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरने इंडियन प्रीमियर लीग IPL च्या 2011 च्या हंगामात राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या मालकांपैकी एकाने 'कानशिलात लगावली होती' असा धक्कादायक खुलासा केला Ross Taylor shocking revelation आहे. माजी कर्णधाराने सांगितले की मोहाली येथे किंग्ज इलेव्हन पंजाब Now Punjab kings विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर फ्रँचायझीच्या मालकाने त्याला कानशिलात लगावली होती. 'रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट' Ross Taylor: Black and White या आपल्या आत्मचरित्रात टेलरने हा खुलासा केला आहे.
‘स्टफ डॉट सीओ डॉट एनजेड’ Stuff.co.nz वर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, तो म्हणाला, आम्ही 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होतो आणि मी खाते न उघडताच बाद झालो. तो म्हणाला, सामना संपल्यानंतर हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बारमध्ये संघ, सपोर्ट स्टाफ आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोक होते. वॉर्नी Shane Warne सोबत लिझ हर्लेही होती. “राजस्थान रॉयल्स संघाच्या मालकांपैकी एक रॉसला म्हणाला की, शून्यावर आऊट होण्यासाठी आम्ही तुला एक दशलक्ष डॉलर्स दिले नाहीत. त्यानंतर त्याच्या तोंडावर तीन-चार चापटी Rajasthan Royals owner slapped to Ross Taylor मारल्या. तो हसत होता आणि ही जोरात चापट नव्हती पण मला खात्री नाही की ते पूर्णपणे नाट्यमय होते.