महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीत 'सौराष्ट्र'च्या मतदारांची भुमिका निर्णायक - सौराष्ट्रच्या मतदारांची भुमिका निर्णायक

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election 2022) प्रचाराचं वारं जोमात वाहत आहे. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकांचा आजवरचा इतिहास पाहिला असता, एक बाब प्रकर्षाने जाणवते की, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर सौराष्ट्रच्या मतदारांचा कल फार मोठा प्रभाव टाकतो. सौराष्ट्रमध्ये (Saurashtra region voters) जो राजकिय पक्ष आघाडीवर राहतो, तो पक्ष गुजरात काबिज करतो, असं आजवरच्या गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहिल्यानंतर लक्षात येतं. त्यामुळे सौराष्ट्रचा मुड काय ? यावर गुजरात निवडणुकीची गणित बऱ्यापैकी अवलंबुन असतात. जाणुन घेऊयात सविस्तर...

Gujarat Election 2022
Gujarat Election 2022

By

Published : Nov 30, 2022, 9:19 PM IST

अहमदाबाद (गुजरात) :गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election 2022) प्रचाराचं वारं जोमात वाहत आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षात यंदा चुरशीची लढाई पाहायला मिळू शकते. एकुण 182 जागांसाठी यंदा निवडणुक होतं आहे. दरम्यान, एकुण 182 जागांपैकी 48 जागा या अत्यंत महत्वपुर्ण आणि निर्णायक मानल्या जाणाऱ्या सौराष्ट्र प्रदेशातील (Saurashtra region voters) आहेत. भावनगर, द्वारका, गिर सोमनाथ, जामनगर, जुनागढ, मोरबी, पोरबंदर, राजकोट, सुरेंद्रनगर आदी भाग मिळुन सौराष्ट्र प्रदेश बनतो.

सौराष्ट्र प्रदेशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीतलं महत्व :दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकांचा आजवरचा इतिहास पाहिला असता, एक बाब प्रकर्षाने जाणवते की, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर सौराष्ट्रच्या मतदारांचा कल फार मोठा प्रभाव टाकतो. सौराष्ट्रमध्ये (Saurashtra region voters) जो राजकिय पक्ष आघाडीवर राहतो, तो पक्ष गुजरात काबिज करतो, असं आजवरच्या गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहिल्यानंतर लक्षात येतं. त्यामुळे सौराष्ट्रचा मुड काय ? यावर गुजरात निवडणुकीची गणित बऱ्यापैकी अवलंबुन असतात.

मोठ्या प्रमाणावर कृषीप्रधान सौराष्ट्र प्रदेश 2017 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 2017 च्या निवडणुकीत या भागातील एकूण 48 पैकी 28 जागा काँग्रेसने खिशात घातल्या होत्या, आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची चांगलीचं दमछाक झाली होती. सौराष्ट्रमधील पटेल म्हणजेच पाटीदार (Patidar) समाज कोणत्या पक्षाच्या पाठीशी उभा राहतो, हि बाब अत्यंत महत्वाची आणि 'टर्निंग पॉइंट' ठरत असते. त्यामुळे, सर्वचं राजकीय पक्ष सौराष्ट्रमध्ये संपुर्ण शक्तीनीशी लढताना आणि सौराष्ट्रच्या मतदारांना कुरवाळताना दिसतात.

भाजपने सौराष्ट्रमध्ये ताकद वाढवली : 2017 गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जरी भाजप गुजरातमध्ये सत्तेत आला असला तरी, सौराष्ट्रमध्ये भाजप पिछाडीवर होता. त्यामुळे निवडणुक जिंकताना भाजपची दमछाक झाली होती. यातुन धडा घेत भाजपने 2017-22 याकाळात सौराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले. पाटीदारांना गोंजारलं. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना भाजपात आणले. यामुळे, यंदाच्या निवडणुकीत भाजपासाठी सौराष्ट्रमध्ये पोषक वातावरण असल्याचं चित्र आहे. याचा फायदा भाजपला निवडणुकीत होईल, यात शंका नाही. हे नक्की.

भावनगर, बोताड, डांग, देवभूमी द्वारका, गिर सोमनाथ, जामनगर, जुनागढ, मोरबी, पोरबंदर, राजकोट, सुरेंद्रनगर आदी भाग मिळुन सौराष्ट्र प्रदेश बनतो.

ABOUT THE AUTHOR

...view details