महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हिमवृष्टीमुळे जगातील सर्वात जास्त लांबीचा 'अटल बोगदा' बंद - अटल बोगदा लेटेस्ट न्यूज

लाहौल-स्पीति आणि मनालीसहीत इतर भागात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अटल बोगदा बंद झाल्यामुळे लाहौलचा कुल्लू जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. रविवारी बीआरओने बर्फ हटविण्यासाठी काम सुरू केले आहे. बोगदा लवकरच पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.

अटल बोगदा
अटल बोगदा

By

Published : Jan 4, 2021, 11:16 AM IST

Updated : Jan 4, 2021, 2:08 PM IST

कुल्लू - हिमाचल प्रदेशातील उंच भागात मागील चार दिवसांपासून सतत बर्फवृष्टी सुरू आहे. लाहौल-स्पीति आणि मनालीसहीत इतर भागात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अटल बोगदा बंद झाल्यामुळे लाहौलचा कुल्लू जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. बीआरओने अटल बोगद्या रोहतांगमधून बर्फ हटवण्याचे काम सुरू केले आहे.

हिमवृष्टीमुळे 'अटल बोगदा' बंद पडला

रविवारी बीआरओने बर्फ हटविण्यासाठी काम सुरू केले आहे. बोगदा लवकरच पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. नवीन वर्षात प्रथमच अटल बोगदा रोहतांग हिमवृष्टीमुळे बंद झाला आहे. तथापि, काही पर्यटक बर्फवृष्टीमुळे सिस्सूमध्ये मुक्कामी आहेत. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर रविवारी केवळ मनालीमधील वाहनांना सोलंगनालापर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली.

बर्फामुळे पर्यटकांना सोलंगनालाकडे जाण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर खराब हवामान पाहता लाहौल-स्पीति प्रशासनाने एक परीपत्रक जारी केले आहे. वाहनचालकांना धोका न पत्करण्याचा इशारा दिला आहे. खराब हवामानात लोकांनी दुर्गम भागात जाऊ नये, असे पंकज राय यांनी म्हटलं.

जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही वाहनाला अशा हवामानात प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही. आपत्कालीन प्रवासासाठी परवानगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्राशी नियंत्रण कक्षातून देण्यात येईल, असे एसपी मानव वर्मा म्हणाले.

अटल बोगद्याची वैशिष्ट्ये -

अटल बोगद्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. बोगद्याची यंत्रणा डीआरडीओने विकसित केली आहे. या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेश लेह-लडाख भागाला कायम जोडलेला राहणार आहे. 'अटल बोगदा' हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय सेनेसाठी वरदान ठरणार आहे. अटल बोगद्याची लांबी 9.2 किलोमीटर तर, 10 मीटर रुंद आहे. या बोगद्याच्या निर्माणासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. समुद्र सपाटीपासून 3000 मीटर (सुमारे 10,000 फूट) हिमालयातील पिर पंजाल पर्वतरांगांमध्ये अल्ट्रा मॉडर्न पद्धतीने हा बोगदा खोदण्यात आला आहे. दररोज 3000 कार आणि 1500 ट्रक कमाल 80 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने प्रवास करू शकतील. साधारणपणे 3,200 कोटी खर्च या बोगद्यास आला आहे.

Last Updated : Jan 4, 2021, 2:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details