महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 12, 2022, 8:52 PM IST

ETV Bharat / bharat

Lalu Prasad Yadav : लालूंची तब्बेत अजूनही नाजूक, मुलगी रोहिणी आचार्य यांनी ट्वीट करून दिली माहिती

राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, किडनी दान करणाऱ्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. (rohini acharya tweet on Lalu Prasad Yadav). (Lalu Prasad Yadav health update).

Etv Bharat
Etv Bharat

पाटणा : राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले आहे. (Lalu Prasad Yadav Kidney Transplant). दिर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लालू प्रसाद यादव यांना त्यांची मुलगी रोहिणी आचार्य (rohini acharya) यांनी आपली किडनी दिली आहे. 74 वर्षीय लालूंचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन सिंगापूरमध्ये करण्यात आले. दरम्यान, किडनी दान करणारी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लालूंची कन्या रोहिणी आचार्य यांचे ट्विट :रोहिणी आचार्य यांनी सोमवारी ट्विट केले आणि म्हणाल्या, "आज मी तुमच्या आशीर्वादाने रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर घरी आले. परंतु माझे वडील अजूनही रुग्णालयात आहेत. त्यांची प्रकृती काहीशी नादुरुस्त आहे. वडिलांनी लवकर बरे व्हावे आणि तुमच्या हक्कांसाठी आवाज उठवावा यासाठी त्यांना फक्त तुमच्या प्रार्थनांची ताकद हवी आहे".

लालूंना अजून डिस्चार्ज नाही : लालू प्रसाद यादव यांचे ५ डिसेंबरलाच किडनी प्रत्यारोपण झाले होते. लालू आणि त्यांची मुलगी रोहिणी या दोघांना सिंगापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रोहिणीच्या प्रकृतीत सुधारणा पाहून त्यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र लालू यादव यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details