महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मैसूर येथील शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क रोबोट टीचर, हे आहे वैशिष्ट्य - रोबोट शिक्षक मैसूर

तंत्रज्ञानात जग मोठी प्रगती करत आहे. टॅब, मोबाईल, इंटरनेट या सारख्या साधनांमुळे लोकांचे मनोरंजन तर होतच आहे, त्याचबरोबर त्यांना ज्ञानही मिळत आहे. कोरोना काळात तर हे साधन विद्यार्थ्यांना चागलेच फायद्याचे ठरले. अशात आता विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क रोबोट टीचर उपलब्ध झाला आहे.

robot teacher Mysuru
रोबोट टिचर मैसूर

By

Published : May 26, 2022, 12:46 PM IST

मैसूर (कर्नाटक) - तंत्रज्ञानात जग मोठी प्रगती करत आहे. टॅब, मोबाईल, इंटरनेट या सारख्या साधनांमुळे लोकांचे मनोरंजन तर होतच आहे, त्याचबरोबर त्यांना ज्ञानही मिळत आहे. कोरोना काळात तर हे साधन विद्यार्थ्यांना चागलेच फायद्याचे ठरले. अशात आता विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क रोबोट टीचर उपलब्ध झाला आहे. शांताला विद्यापीठात रोबोट लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. येथे रोबोट हे शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवत आहे. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवणे तसेच मनोरंजनातून त्यांना शालेय शिक्षण देण्याचे कार्य यातून होणार आहे.

हेही वाचा -नरेंद्र मोदी सरकारच्या 8 वर्षात सर्वसामान्यांना काय मिळाले?

रोबोट लॅबने मुलांची आवड आणि कुतूहल जागृत केले आहे. केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या या संस्थेत एलकेजी ते दहावीपर्यंत सुमारे पाचशे विद्यार्थी आहेत. वर्गांच्या गरजेनुसार रोबोटला तयार करण्यात आले आहे. गाणे, कथा आणि मनोरंजनाच्या माध्यमातून रोबोट द्वारे एलकेजी ते वर्ग 2 च्या विद्यार्थ्यांची साक्षरता वाढवण्यावर भर दिला जात आहे. मजकुराव्यतिरिक्त, प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासेतर उपक्रम देखील शिकवले जातात.

रोबोट शिकवत असलेले प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे साहित्य दिले जाते. काही दिवसांतच विद्यार्थ्यांनी रोबोटचे धडे ऐकलेले अनेक प्रकल्प तयार केले आहेत. रोबोटला असलेली 86 सेमीची स्क्रिन मुलांना शिक्षक त्यांच्यासमोर उभे आहेत, बोलत आहेत आणि गाण्याकडे हात हलवत आहेत, असे दाखवते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणारा हा रोबोट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या रोबोटचा वापर मागासलेल्या विद्यार्थ्यांचे, तसेच हुशार विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि शिकण्याची पातळी वाढविण्यासाठी केला जात आहे. प्रत्येक वर्गाला रोबोट लॅबमध्ये शिकण्यासाठी 45 मिनिटे दिलेली आहेत. धड्यादरम्यान विद्यार्थ्यांचे निरीक्षण करण्यासाठी शिक्षकांना देखील क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यासाठी नियुक्त केले जाते. अशा प्रकारे, प्रत्येक विद्यार्थ्याचा या प्रकल्पात सक्रिय सहभाग असतो.

शाळेत 2 रोबोट शिक्षक शिकवत असून हे रोबोट जपानमधून आणले आहेत. मध्य प्रदेशातील कंपनीचे अमित, राहुल आणि इतर तरुणांनी कार्यक्रम अंमलबजावणी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली आहे. प्रकल्पासाठी लागणारी प्लास्टिक उपकरणे विविध देशांतून आयात केली जातात. काल शांताला विद्यापीठात या लॅबचे उद्घाटन झाले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी.सी नागेश यांनी या लॅबचे उद्घाटन केले.

हेही वाचा -अनिल परब बॅग भरा! ईडीच्या कारवाईवर सोमैयांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details