नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा ( Robert Vadra wants to contest from Moradabad ) मुरादाबाद लोकसभा ( Moradabad Lok Sabha seat ) मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप ठरलेले नसले तरी त्यांनी तसे संकेत दिले आहेत. राजकारणात येण्याच्या चर्चेदरम्यान दिलेल्या एका खास मुलाखतीत रॉबर्ट वड्रा म्हणाले की, ते आपल्या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतात. मात्र, त्यांना राजकारणात येण्यासाठी आणि मुरादाबादचे प्रतिनिधीत्व करण्यासंदर्भात विनंत्या आल्या आहेत.
भाजपा किंवा इतर कोणत्याही पक्षाविरुद्ध लढण्यासाठी राजकारण हा एकमेव मार्ग आहे. कारण ते आमच्यावर आरोप करत राहतात. मी अजून हे ठरवले नाही पण हो, माझा मुरादाबादमध्ये कौटुंबिक व्यवसाय आहे. माझे पूर्वज तिथले होते आणि माझे सामाजिक कार्यही तिथले आहे. त्यामुळे मी मुरादाबादचे प्रतिनिधित्व करावे, असे मला वाटते. इतर अनेक पक्षांनी मला ऑफर दिल्या आहेत, पण माझे लक्ष काँग्रेसवर आहे. त्यामुळे मी अजून निर्णय घेतलेला नाही. पण मला वाटते की मी लवकरच यावर निर्णय घेणार आहे, असे वाड्रा यांनी सांगितले.
माझ्यावरील आरोप खोटे -
आपल्यावरील आरोपांबाबत रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून मी पाहिले आहे की केवळ भाजपाच नाही तर आम आदमी पार्टीसारखे काही पक्षही अफवा पसरवत आहेत. ते माझ्यावर जे काही आरोप करत आहेत ते पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत