महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amritsar Crime News : पंजाब नॅशनल बँकेत भरदिवसा दरोडा, पिस्तुलाच्या धाकावर 18 लाखांचा ऐवज लुटला - पंजाब नॅशनल बँकेत भरदिवसा दरोडा

पंजाबच्या अमृतसर शहरातील पंजाब नॅशनल बँकेत दरोडा पडला आहे. (Robbery in Punjab National Bank). विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँकेची ही शाखा कथुनंगल पोलीस स्टेशनपासून फक्त 300 मीटर अंतरावर आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. (Robbery in Punjab National Bank in Amritsar).

Crime
Crime

By

Published : Dec 19, 2022, 9:19 PM IST

अमृतसर (पंजाब) : अमृतसर शहरातील कथुनंगल येथील पंजाब नॅशनल बँकेत दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. (Robbery in Punjab National Bank). हा दरोडा अज्ञात दरोडेखोरांनी टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बॅंकेतील सुमारे 18 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता बँकेतल्या दरोड्याची ही घटना घडली. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. बँकेच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिसराचा शोध घेतला जात आहे. (Robbery in Punjab National Bank in Amritsar).

10 वर्षांपासून बँकेत गार्ड नाही : विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँकेची ही शाखा कथुनंगल पोलीस स्टेशनपासून फक्त 300 मीटर अंतरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांकडे शस्त्रे होती. या घटनेनंतर बॅंकेच्या प्रशासनाची देखील एक मोठी चूक दिसून आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांपासून या बँकेत एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details