संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये दरोडा रांची : Robbery In Jammu Tawi Express : दरोडेखोरांनी चक्क संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना लातेहार आणि वरवाडीह रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. दरोडेखोरांनी रेल्वेमधील अनेक प्रवाशांना मारहाण ( Train Loot Case ) केल्यानं प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना जम्मू तावी एक्सप्रेसमधील बोगी क्रमांक एस 9 मध्ये घडली आहे. लुटमारीच्या घटनेनंतर प्रवाशांनी डाल्टनगंज रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ केला.
संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये लुटमार :संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांनी लुटमार केल्यानं प्रवाशी हादरले आहेत. ही रेल्वे लातेहार रेल्वे स्थानकावरुन सुरु होताच, सात ते आठ दरोडेखोरांनी रेल्वेच्या एस 9 बोगीला लुटण्यास सुरुवात केली. यावेळी या दरोडेखोरांनी शस्त्रांच्या धाकावर प्रवाशांना लुटल्याची घटना घडली. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांवर जरब बसवण्यासाठी या दरोडेखोरांनी गोळीबारही केला. एस 9 बोगीत तब्बल 35 ते 40 मिनीटं या दरोडेखोरांनी 'तांडव' केलं. बारवाडीह इथं गाडी थांबताच दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले. या दरोडेखोरांच्या मारहाणीत अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रवाशांनी घातला गोंधळ :दरोडेखोरांनी लुटमार केल्यानंतर प्रवाशी प्रचंड संतप्त झाले. या प्रवाशांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर उपचाराची मागणी केली. प्रवाशांच्या गोंधळामुळे संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेस तब्बल दीड तास रेल्वे स्थानकावर उभी होती. रेल्वेत दरोड्याची घटना घडल्यानं वरिष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्यांनी रेल्वेतील घटनास्थळाला भेट दिली. पलामूचे सदरचे एशडीएम राजेश कुमार शाह यांच्यासह आरपीएफ आणि जीआरपीएफचे अधिकारी तत्काळ डाल्टनगंज रेल्वे स्थानकावर पोहोचले.
दरोडेखोरांनी केली मारहाण :संबळपूर जम्मू तावी एक्सप्रेसमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी अगोदर प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आल्यानंतर दरोडेखोरांनी लुटमार सुरु केल्याची माहिती प्रवाशी महेश यांनी दिली. दरोडेखोरांनी सगळी बोगी लुटल्याचंही महेश यांनी यावेळी सांगतिलं. तर रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं या लुटमारीची माहिती दिली. दरोडेखोरांनी मारहाण केलेल्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावरच उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आलं असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
हेही वाचा :
- चालत्या ट्रेनमधून मोबाईल लुटल्याचा लाइव्ह व्हिडिओ व्हायरल