कटनी (मध्य प्रदेश) :कटनी शहरातील बारगव्हाण येथे भरदिवसा घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. मणप्पुरम गोल्ड लोन फायनान्स कंपनी (katni gold loan bank robbery) च्या कार्यालयात दिवसाढवळ्या दरोडा टाकून बंदूकधारी दरोडेखोरांनी 15 किलो सोने (दागिने) आणि सुमारे 7 कोटी रुपयांची रोकड लंपास केली. (Katni Robbery). दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करून बंदुकीच्या जोरावर लॉकरचे कुलूप उघडून सोने व पैसे घेऊन दुचाकीवरून पळ काढला. दरोडेखोरांची संख्या 6 ते 7 असल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
फायनान्स कंपनीत दिवसाढवळ्या दरोडा :बँकेचे विक्री अधिकारी राहुल कोस्टा यांनी सांगितले की, सकाळी साडेनऊ वाजता बँक उघडल्यानंतर ७ कर्मचारी काम करत होते. सकाळी 10.30 च्या सुमारास हातात रिव्हॉल्वर घेतलेले चार तरुण आतमध्ये घुसले. ते येताच दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना धमकावणे सुरू केले आणि आवाज केल्यास गोळ्या घालण्याची धमकीही दिली. या कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याने विरोध केल्यावर त्याच्याशी हाणामारीही झाली. मारामारीनंतर तरुणांनी सहायक शाखा व्यवस्थापक यांच्याकडील चावी हिसकावून घेतली आणि लॉकरमध्ये ठेवलेले सोने व रोख रक्कम घेऊन दरोडेखोर दुचाकीवरून पळून गेले. एवढेच नाही तर दरोडेखोरांनी एका कर्मचाऱ्याची दुचाकीही सोबत नेली. गुन्हा केल्यानंतर सर्व आरोपी दुचाकीवरून वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर रंगनाथ नगर पोलिस ठाण्यासह कोतवाली, माधव नगर, एनकेजे, कुथला पोलिस ठाण्याचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले.