फिरोजाबाद / बलिया / वाराणसी :उत्तरप्रदेशातून केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. याबाबत विद्यार्थी आक्रमक झाले असून, राज्यात हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली ( Agneepath Scheme Protest UP ) आहे. फिरोजाबाद आणि बलिया येथे रेल्वे, बसगाड्या पेटवण्यात आल्या असून, वाराणसीतही आंदोलन सुरु आहे. पाहुयात उत्तरप्रदेशात कुठे, कसे आंदोलन आहे सुरु..
संतप्त तरुणांनी जाळली बस - संतप्त तरुणांनी उत्तर प्रदेश सरकारची रोडवेज बसही पेटवून दिली. शेकडो तरुणांचा गोंधळ पाहून पोलीस अधिकारी खैर राकेश भदोरिया, एसपी पुनीत द्विवेदी, टप्पल येथे तैनात इन्स्पेक्टर यांच्यासह अनेक पोलीस ठाण्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. सकाळपासूनच टप्पल परिसरातील शेकडो तरुण यमुना एक्स्प्रेस वेवर जमू लागले होते. तरुणांची मोठी गर्दी होताच त्यांनी टप्पल महामार्ग रोखून धरला. अलिगढहून मथुरेला जाणारी उत्तर प्रदेश सरकारची रोडवेज बस थांबवल्यानंतर तरुणांनी बस पेटवून दिली. तरुणांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. तरूण सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. टप्पल महामार्गावर हजारो तरुण उपस्थित आहेत. पोलिसांचे प्रमाण कमी असल्याने पोलिस विभागही तरुणांचा उद्रेक शमवण्यात कमी पडत आहेत.