कोलकाता: वाढत्या डिजिटल संसाधनांच्या युगात, प्रकाशित साहित्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत आहे आणि लोक आता गोष्टी डिजिटल वाचण्यास प्राधान्य देत आहेत. पण कोलकाता येथील मोहम्मद तौसिफ रहमान ( Mohammad Tousif Rahman ) लोकांना स्मार्टफोन आणि किंडल्सच्या जमान्यात पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित करत आहेत. त्यासाठी ते ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला ग्रंथालये ( Roadside library ) सुरू करत आहेत. रहमानची ही कल्पना सर्वांना आकर्षित करत आहे.
अलीमुद्दीन स्ट्रीट बस स्टॉपजवळ त्यांनी नुकतेच मोफत खुले वाचनालय ( Open library Alimuddin Street bus stop ) सुरू केले आहे. स्थापनेपासून हे वाचनालय बसची वाट पाहणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या रोड साइड लायब्ररीमध्ये बंगाली, हिंदी, इंग्रजी, उर्दू इत्यादी भाषेतील मुलांची मासिके, कवितांची पुस्तके, कादंबऱ्या इत्यादी उपलब्ध आहेत. या माध्यमातून बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना पुस्तके वाचून वेळेचा सदुपयोग करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.